Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule: शांततेच्या मार्गाने आम्ही अनेक वर्षे आंदोलन केलीत; यावर बंदी आणणे ही हुकूमशाहीकडे वाटचाल -सुप्रिया सुळे

संविधानाने दिलेल्या या आधिकारानुसार देशात आपण कुठेही शांतातेने जात संसदेचा सचिवच अश्या प्रकारची नोटीस काढत संसदेच्या परिसरात तुम्ही कुठेही आंदोलन करू शकत नाही. तर हा लोकशाहीचा अपमान आहे मी त्याची निंदा करते जाहीर निषेध करते. फ्रीडम ऑफ स्पीचचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

Supriya Sule: शांततेच्या मार्गाने आम्ही अनेक वर्षे आंदोलन केलीत;  यावर बंदी आणणे ही हुकूमशाहीकडे वाटचाल -सुप्रिया सुळे
Supriya Sule Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 2:14 PM

पुणे – ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) छगन भुजबळ सातत्याने बोलत आहे. राजकारण बाजूला ठेऊन भुजबळांसारख्या नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा. आपण देशात कोठेही आंदोलन करु शकतो. संसदेत शांततेच्या मार्गाने आम्ही अनेक वर्षे आंदोलन केलीत. यावर बंदी आणणे ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. या निर्णयाचा निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कितीही किंमत मोजावी लागली तरी या विरोधात लढणार. हे संविधान विरोधी सरकार आहे. ‘जुमलाबाजी’ हा असंसदीय शब्द कसा होऊ शकतो.आर्टिकल 19  मधून सर्वांना फ्रीडम ऑफ स्पीच अधिकार मिळाला आहे. संविधानाने दिलेल्या या आधिकारानुसार देशात आपण कुठेही शांतातेने जात संसदेचा सचिवच अश्या प्रकारची नोटीस काढत संसदेच्या परिसरात तुम्ही कुठेही आंदोलन करू शकत नाही. तर हा लोकशाहीचा अपमान आहे मी त्याची निंदा करते जाहीर निषेध करते. फ्रीडम ऑफ स्पीचचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. या देशाला सत्याग्रहाच्या मार्गाने महात्मा गांधींनी स्वतंत्र मिळवून दिले आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून लढले पाहिजे असे मत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचं षडयंत्र

सध्याच सरकार हे गोंधळलेलं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अपमान होतोय, मुख्यमंत्र्यांचा अपमान हा राज्याचा अपमान आहे. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे काही तरी मोठं षडयंत्र भाजप रचत असल्याच वाटत. मला मुख्यमंत्र्यांची खुप काळजी वाटते. कोण कोठल्या पक्षात आहे हे लक्ष्यात राहत नाही, याबाबतीत मी गोंधळलेली आहे. सोयी प्रमाणे राजकारण सुरु आहे. राजकारण हा व्यवसाय नाही. लोकांकडून पैसे घेणे, धमक्या देणं यासाठी राजकारण नसत. पहिल्या 3 चार दिवसात अश्या घटना घडल्यात की उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करतायेत असा आरोपही सुळे यांनी केला आहे. आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांना प्रोटेक्त केलं पाहिजे. महाराष्ट्रात नवं 5 स्टार कल्चर सुरु झालं आहे, हे दुर्देव आहे. दरारा, कर्तृत्व हे कामातून येत ज्याच्याकडे 105 आमदार आहे ते 1 आमदार असलेल्यांच्या घरी जातात असेही त्या म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.