“जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात आता, कलम करण्यासाठी…”; ठाकरे गटाने एकाच वाक्यात एकनाथ शिंदे यांना सुनावलं…
ज्या शिवसेनेने ज्यांना मोठे केले, नेते झाले तिच माणसं आता शिवसेनेच्या मुळावर उठली आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर केलेल्या आमदारांवर जोरदार घणाघात केला.
जुन्नर/पुणेः शिवसेनेला फूट ही काही नवीन नाही. शिवसेना सोडून अनेक जण यापूर्वी गेले आहेत, मात्र ते कधी शिवसेनेच्या मुळावर उठले नाहीत. मात्र आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मुळावर उठल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मातोश्रचे महत्व कोणी हिरावू शकत नाही पण जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात आता कलम करण्यासाठी आता तयार व्हावं लागेल अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलं आहे.
सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत शिंदे गटावर टीका करताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या.
शिवसेनेतून याआधी नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते. हे नेते बाहेर गेल्यानंतरही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना कधीच गलितगात्र झाली नाही.
मात्र आता ज्या शिवसेनेने ज्यांना मोठे केले, नेते झाले तिच माणसं आता शिवसेनेच्या मुळावर उठली आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर केलेल्या आमदारांवर जोरदार घणाघात केला.
ज्या दिवसांपासून एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. त्या दिवसांपासून त्यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातला आहे.
शिवसेना संपवताना शिवसेना भवनावरही त्यांचा डोळा असून शिवसेना भवनावर ते ताबाही घेतील असा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
एकनाथ शिंदे आता प्रतिशिवसेना भवन उभं करतील अशी शक्यताही सुषमा अंधारे यांनी भर सभेत बोलून दाखवली. शिवसेना भवन हे जागरुक देवस्थान आहे.
त्यामुळे मातोश्री आणि शिवसेना भवनाचे अदिष्ठाण हिरावून घेऊ शकत नाही असा पलटवारही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत असतानाच ज्यांनी शिवसेनेकडे हात केला आहे, त्यांचे हात कलम करण्याची चिथावणीही त्यांनी दिली आहे.
यावेळी सुषमा अंधारे यांनी कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूकींच्या रिंगणात अनेकांनी गुडग्याला बाशिंग बांधले आहे.
त्यामध्ये उमेदवार आणि आघाडी आणि युतीतील पक्षही पोट निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे मात्र राजकारणात शेवटी AB फॉर्म मिळाल्याशिवाय काय खरं नसतं असा टोला सचिन आहेर यांनी लगावला आहे.