घोटाळे बाहेर आलेले चारही मंत्री कोणाचे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या,…
धुर्त आणि कपटी राजकारणाचं दुसरं नाव हे देवेंद्र फडणवीस आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
पुणे : महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, की नवीन वर्षात सरकार पडेल. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, हे आम्ही चार-सहा वर्षांपासून सांगतोय की, नवीन वर्षात सरकार पडेल. खरं तर २०२४ ला निवडणुका व्हायला हव्यात. पण, शिंदे-फडणवीस सरकार २०२३ ला पडेल. त्याची अनेक लक्षणं दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना त्रास देणं सुरू केलं. भाजपच्याच तीन आमदारांनी तारांकित प्रश्न विचारून एकनाथ शिंदे यांना भूखंडप्रश्नी अडचणीत आणले. अधिवेशनात ज्या चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले ते चारही मंत्री शिंदे गटाचे आहेत. ज्या १५ जणांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीनचीट दिली ते सर्व जण भाजपचे आहेत.
भाजपच्या लोकांचे संरक्षण, शिंदे गटाच्या लोकांची गच्छंदी होत आहे. त्यात काल अब्दुल सत्तार यांचं स्टेटमेंट आलंय. धुर्त आणि कपटी राजकारणाचं दुसरं नाव हे देवेंद्र फडणवीस आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये दुर्घटना घडली. दोन जणांचे कारखान्याच्या स्फोटात गेलेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत जाहीर केली. पण, शिंदे यांच्या आपत्ती व्यवस्थापण विभागात फार काही गोष्टी दिसत नाहीत, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. महिला बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्री नसणं हे दुर्दैवी आहे.
किरीट सोमय्या हे आरंभसूर आहेत. ते चौकशी फार करतात. पण, त्याचं पुढं काय होत ते कळत नाही. राहिला प्रश्न बंगल्यांची चौकशी करायचा. तर किरीट सोमय्या यांचा टेस्ट बदलला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडं सहा बंगले एकाचवेळी कसे याच्यावर एकदा त्यांनी बोलले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.