या महापुरुषांना मोठे करण्यासाठी इतर महापुरुषांना मोडीत काढण्याचा डाव, सुषमा अंधारे यांचा घणाघात

मी सोशली करेक्ट असल्याचं सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितलं.

या महापुरुषांना मोठे करण्यासाठी इतर महापुरुषांना मोडीत काढण्याचा डाव, सुषमा अंधारे यांचा घणाघात
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 6:32 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यावर हिरीरीनं पुढं येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापुरुषांवर बोलल्यावर मात्र पुढं येत नाहीत, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. हेडगेवार आणि गोळवलकर हे दोनचं महापुरुष त्यांना ठेवायचे आहेत. हेडगेवार आणि गोळवलकर यांना महापुरुष करण्यासाठी इतर महापुरुष मोडीत काढण्याच्या भाजपचा प्रयत्न असल्याचंही त्या म्हणाल्या.

कालही त्यांनी मोर्चे करताना फुले, आंबेडकर आणि हेडगेवार असं केलं. हे करत असाल तर महाराष्ट्र दूधखुळा नाही. महाराष्ट्र तुमच्या अशा षडयंत्रांना बळी पडणार नाही. हेडगेवार आणि गोळवलकर हे आमचे आदर्श असूचं शकत नाहीत. सुषमा अंधारे ही लाईन स्पष्टपणे मांडते. हे त्यांना पडत नाही. त्यामुळं ते अशापद्धतीनं मला कुणीतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझ्यासाठी पोलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेंक्ट असणं फार महत्त्वाचं आहे. मी सोशली करेक्ट असल्याचं सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना सोडून दिलं. आता ते उद्धव ठाकरे तुम्ही उत्तरं द्या. शरद पवार तुम्ही उत्तरं द्या, असं म्हणताहेत. एकीकडं तुम्ही म्हणता मी पाच महिन्यांचं बाळ आहे, असं म्हणता. मग, पाच महिन्यांच्या बाळानं तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत का, असा पटलवारही सुषमा अंधारे यांनी केलाय.

माझ्याविरोधात कट चालू आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणतात. हे खरं आहे. पण, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भाजपात षडयंत्र आखलं जातंय. चंद्रकांत पाटील कुठं जातात. किती वाजता जातात. त्यांच्याबरोबर किती जण असतात. याची माहिती कुणाला असेल. ती भाजपलाचं असेल. त्यामुळं भाजपलाचं ते कळलेलं असेल, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.