पुणे – देश सेवेचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defense Academy) प्रेरणा स्थान आहे. याच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झालेल्या 147 व्या तुकडीच्या विद्यार्थ्याचा (Student) संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव जी प्रत्युष व असून तो मूळचा बंगळुरुचा राहणार आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वीच (7 फेब्रुवारी) तो एनडीएत दाखल झाला होता. दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या होस्टेलच्या खोली समोर तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. प्रयत्न करूनही शुद्धीवर न आल्याने त्याला प्रबोधिनीच्या लष्कर रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीचा त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नेमक काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा बंगळुरुचा जी प्रत्युष 147व्या तुकडीचा विद्यार्थी होता. चार दिवसांपुर्वी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाला होता. मात्र घटनेच्या दिवशी सांयकाळी 5 च्या दरम्यान तो त्याच्या होस्टेलच्या खोलीसमोर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. अनेक प्रयत्न करूनही तो शुद्धीवर न आल्याने त्याला तातडीने प्रबोधिनीच्या परिसरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत प्रबोधिनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत कॅडेटच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. तसेच घटनेचा अहवाल स्थानिक पोलीस प्राधिकरणाकडे देण्यात आला आहे. तसेच छात्राच्या मृत्युचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनही केले जात आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत.
मृत्यू कारणही अद्याप
देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित दाखल झालेल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रबोधीनीच्या प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळेल अशी माहिती उत्तम नगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश जायभाय यांनी दिली आहे.
लता मंगेशकर अध्यासन केंद्राला कुटुंबीयांचा आक्षेप, पत्राद्वारे कुलगुरूंना कळवली नाराजी