Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली, पुण्यात राजू शेट्टींचा हल्लाबोल

कोल्हापूर पोटनिवडणुकीत (Kolhapur north byelection) आम्ही भूमिका घेतली नव्हती. कोण जिंकले, कोण हारले याने आम्हाला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे.

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली, पुण्यात राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुणे श्रमिक पत्रकार संघात राजू शेट्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 4:08 PM

पुणे : कोल्हापूर पोटनिवडणुकीत (Kolhapur north byelection) आम्ही भूमिका घेतली नव्हती. कोण जिंकले, कोण हारले याने आम्हाला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे. ते म्हणाले, की दोन्ही आघाड्यांनी प्रचाराची खालची पातळी गाठली होती. हे लोकशाहीसाठी घातक आहे. या निवडणुकीत आमची कोणतीही भूमिका नव्हती. निवडणूक म्हटले, की कोणी जिंकत असते, कोणी हारत असते. मात्र ज्या पद्धतीने सर्व सुरू होते, ते लोकांना आवडले नाही. महात्मा गांधींची नोट चालली. दोघांनी वाटली, असा आरोप यावेळी राजू शेट्टींनी केला. तर एका निवडणुकीतून महाविकास आघाडीविषयीचा निष्कर्ष काढता येणार नाही. हा मतदारसंघ शहरी होता. ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावे लागेल, असे ते यावेळी म्हणाले.

‘शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर बिलाचे पैसे का द्यावे’

भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. विजेचे वाटप करताना पक्षपात होत आहे. इतरांना 24 तास वीज, शेतकऱ्यांना मात्र आठ तास तीही रात्रीची वीज दिली जाते. आता त्यातही कपात केली आहे. तीन तास वीज दिली जाते. शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर बिलाचे पैसे का द्यावे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

‘ठरवून राजकारण होत आहे’

सगळ्यांनी ठरवून सध्याचे राजकारण सुरू केले आहे. महागाई वाढली आहे. शेती साहित्य महागले आहे आणि महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाजवा, भोंगे वाजवा याचे राजकारण सुरू आहे. दुर्दैवी आहे हे सगळे, काय बोलायचे यावर, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आणखी वाचा :

Kolhapur Elections | ईडीची भीती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वार

Kolhapur By Election Result 2022 : पोहोचलो रे हिमालयात, कोल्हापूर उत्तरच्या पराभवानंतर चंद्रकांतदादांचे मिम्स व्हायरल; काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

Kolhapur By Election Result 2022: कोल्हापूरात पराभव, आता हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, नाना लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.