पुणे : कोल्हापूर पोटनिवडणुकीत (Kolhapur north byelection) आम्ही भूमिका घेतली नव्हती. कोण जिंकले, कोण हारले याने आम्हाला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे. ते म्हणाले, की दोन्ही आघाड्यांनी प्रचाराची खालची पातळी गाठली होती. हे लोकशाहीसाठी घातक आहे. या निवडणुकीत आमची कोणतीही भूमिका नव्हती. निवडणूक म्हटले, की कोणी जिंकत असते, कोणी हारत असते. मात्र ज्या पद्धतीने सर्व सुरू होते, ते लोकांना आवडले नाही. महात्मा गांधींची नोट चालली. दोघांनी वाटली, असा आरोप यावेळी राजू शेट्टींनी केला. तर एका निवडणुकीतून महाविकास आघाडीविषयीचा निष्कर्ष काढता येणार नाही. हा मतदारसंघ शहरी होता. ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावे लागेल, असे ते यावेळी म्हणाले.
भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. विजेचे वाटप करताना पक्षपात होत आहे. इतरांना 24 तास वीज, शेतकऱ्यांना मात्र आठ तास तीही रात्रीची वीज दिली जाते. आता त्यातही कपात केली आहे. तीन तास वीज दिली जाते. शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर बिलाचे पैसे का द्यावे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
#Pune : कोल्हापूर पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय.#rajushetty #KolhapurNorth #Politics #Pune
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/TlyUhx6psH— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2022
सगळ्यांनी ठरवून सध्याचे राजकारण सुरू केले आहे. महागाई वाढली आहे. शेती साहित्य महागले आहे आणि महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाजवा, भोंगे वाजवा याचे राजकारण सुरू आहे. दुर्दैवी आहे हे सगळे, काय बोलायचे यावर, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.