दौंड- दिवाळीच्या सणानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सद्या बारामतीतील आपल्या घरी आहेत. कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर परिसरातील स्थानिक कार्यक्रमांनाही ते हजेरी लावत आहेत. नुकतेच दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या ‘पवार पॅलेस’ या मंगल कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ”मी इथं आल्यानंतर मला ही अत्यंत रुबाबदार आणि देखणी ही वास्तू बघायला मिळाली. ही वास्तू दौंड तालुक्याच्या वैभवात भर घालणारी आहे. पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे , ते म्हणजे या वास्तूच्या समोरून रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जाताना प्रश्न पडेल की “पवार पॅलेस” या वास्तूचा नक्की मालक कोण? याच विचारात लोक गोंधळून जातील. अन या संबधीची चर्चा सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, त्यांनी असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. ‘राष्ट्रावादीच्या प्रत्येक कार्यकमाला जर ही हक्काची जागा आहे. मात्र हक्काची म्हणूनच केवळ कार्यकर्त्यांनी बघितले तर व्यवासायिक दृष्टीकोनातून बाधण्यात आलेल्या या वास्तूची व्यवसायिक स्थिती काय राहील हे मला सांगता येत नाही.’ असा मिश्किल चिमटाही त्यांनी काढला. परंतु या वास्तूमुळे अत्यंत चांगली सोय याठिकाणी झाल्याचेही ते म्हणाले.
त्यामुळे ‘या सुंदर वास्तूचा सर्वांनी नश्चितपणे लाभ घ्यावा. तसेच इतरांनाही लाभ घेण्यास सांगावे,मात्र आहे लाभ घेताना त्याचं भाडही नक्कीच द्या’ असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात आपण दिवाळीचा आनंद आपण घेऊ शकलो नव्हतो. यंदा कोरोनाचे संकट कमी झाले , मात्र अजूनही संपलेले नाही, तरी आपण काही प्रमाणात दिवाळीचा आनंद घेऊ शकत आहोत. असे म्हणत कोरोनाच्या स्थितेवरही भाष्य केले.
हे ही वाचा:
ऋषिकेश देशमुखांना ओळखत नाही, नवाब मलिक, वळसे-पाटलांना कधीच भेटलो नाही; सुनील पाटलांनी आरोप फेटाळले
तब्बल 500 कोटींची बिले थकल्याने नाशिक पालिकेचा तोळामासा; अवघ्या 98 कर्मचाऱ्यांवर मदार