Pune crime | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू तर एक जखमी

| Updated on: Feb 13, 2022 | 1:44 PM

पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला धडक दिली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाली आहे.

Pune crime | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू तर एक जखमी
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
Follow us on

पुणे – दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील(Pune-Solapur Highway) कासुर्डी गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident)झाल्याची घटना घडली आहे. टोलनाक्याजवळ रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकला स्विफ्ट कारने धडकली. यामध्ये स्विफ्ट कार मधील 2 जणांचा जागीच मृत्यू (Death)झाला आहे. घटनेत बाबू आनाप्पा कोळी आणि शिवयोगी गणपती देसाई याचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाली आहे.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी गावच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आले. कासुर्डी टोलनक्याजवळ मालवाहतूक ट्रक उभा होता. याच दरम्यान पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला धडक दिली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बैलगाडा शर्यत बघून परताना युवकाचा अपघातात मृत्यू
दुसरीकडं पुणे जिल्ह्यातील मावळामधील बैलगाडा शर्यत पाहून घरात परतत असताना तरुणाचं अपघात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अनिल प्रकाश शेटे असं 30 वर्षीय मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत वर्षीय नाणोली घाटात तो शेटेवाडीतून बैलगाडा शर्यत पाहायला आला होता. घटनेच्या दिवशी दुपारी मावळ येथे झालेल्या बैलगाडा शर्यत बघून सव्वा एकच्या सुमारास शर्यत पाहूनअनिल परतत असताना घाटासमोरील मार्गावर आला. त्यावेळी आयशर टेम्पोचा धक्का लागला. यात त्याला डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला.

सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय

Nashik Murder| 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?

Anna Hazare: तुमच्या राज्यात जण्याची इच्छा राहिली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार; उद्यापासून प्राणांतिक उपोषण करणार