Pune crime | पुण्यातील धानोरीत गावगुंडांचा हैदोस ; सर्वसामन्यांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष
मागील काही दिवसांपासून गावगुंडांकडून स्थानिक व्यापारी, नागरिक यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, दारू पिऊन धिंगाणा करणे, दुचाकींचे आवाज काढणे, मकर संक्रातीच्या दिवशी स्थानिक महिला व मुली असताना अक्षय नवगिरे व प्रज्वल शिंदे व त्यांच्या साथीदारांनी शास्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.
पुणे – शहरात गाव गुंडांचा उपद्रव वाढला असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील धानोरी परिसरात स्थानिक गुंडांकडून धारदार सत्रांचा धाक दाखवत व्यापारी व रहिवाशांना धमकावण्यासह खंडणी मागणे, महिला व मुलींची छेडछाड कराण्यांचे प्रकार सातत्याने सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनासह , स्थानिक प्रतिनिधींकडूनही याकडं दुर्लक्ष केलं जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुंडांकडून दुकानांची तोड फोड मागील काही दिवसांपासून गावगुंडांकडून स्थानिक व्यापारी, नागरिक यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, दारू पिऊन धिंगाणा करणे, दुचाकींचे आवाज काढणे, मकर संक्रातीच्या दिवशी स्थानिक महिला व मुली असताना अक्षय नवगिरे व प्रज्वल शिंदे व त्यांच्या साथीदारांनी शास्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी लावून नागरिकांना त्यांच्या घरी जबरदस्तीने पिटाळले. या घटनांमुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नेमकं कोण मदत करते? कोणाच्या जीवावर ते दादागिरी करतात? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक नगरसेवक, आमदार अथवा कोणतेही लोकप्रतिनिधी यांच्याकडून दाद मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या दहशतीमुळे तक्रार देण्यासही कोणी धजावत नाही. भविष्यात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे माता नागरिकांनी व्यक्त केलं आहे .
रहिवाश्यांचा आंदोलनाचा इशारा गेल्या आठवड्यातच गाव गुंडांनी दहशत केल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी कोणतीच तक्रार घेतली नसल्याने पुन्हा एकदा बुधवारी रात्री गुंडांनी दहशत माजवली. व्यापारी व रहिवाशांमध्ये भीती निर्माण केली. या गुंडांना त्वरित अटक न केल्यास दुकाने बंद करुन आंदोलन करण्याचा इशारा येथील व्यापारी संघटनेने दिला आहे. या गल्लीतील गुंडावर कारवाई करण्याची मागणी धानोरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ टिंगरे यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे. धुडगूस घालणाऱ्या दोन जणांना रात्री उशिरा विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फुल शेतीतून शेतकऱ्याच्या जीवनात दरवळेल उत्पन्नाचा सुगंध, जाणून घ्या लागवडीची योग्य पध्दत..!
कोण आहेत शैलेंद्र वेलिंगकर ज्यांच्या जीवावर शिवसेना गोव्याच्या आखाड्यात उतरलीय?
VIDEO: Beed मध्ये Tractor चालकाचा जीवघेणा Stunt, video सोशल मीडियावर viral