दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS च्या अहवालात धक्कादायक माहिती

| Updated on: Jul 26, 2023 | 12:06 AM

एटीएसच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचं उघड झालंय. संबंधित माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS च्या अहवालात धक्कादायक माहिती
terrorist
Follow us on

पुणे | 25 जुलै 2023 : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन सशंयितांना पकडलं होतं. ते दोन्ही तरुण हे दहशतवादी असल्याचा संशय होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली. या तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली. दोन्ही तरुण हे इसिसच्या अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली. या दोन्ही तरुणांच्या घरी पोलिसांनी झाडझडती घेतली असता पोलिसांच्या हाती महत्त्वाचं साहित्य लागलं. यामध्ये इलेक्ट्रिक यंत्रणेसह स्फोटक पावडर मिळालं. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण हे कोथरुडमध्ये नाकाबंदीच्या वेळी पकडण्यात आले होते. दहशतवाद विरोधी पथकाने या तरुणांना ताब्यात घेतलं होतं. या दोन्ही दहशतवाद्यांची आज कोठडी संपणार होती. त्यामुळे त्यांना आज पुन्हा जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी एटीएसने एक अहवाल सादर केला. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली.

एटीएसकडून 436 पानांचा अहवाल कोर्टात सादर

आरोपींना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांचं घातपातासाठी पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आलं आहे, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. एटीएसने पेनड्राईव्हच्या माध्यमातून तपासातून निघालेल्या माहितीचा 436 पानांचा अहवाल आज कोर्टात सादर केला. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.

आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

या दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी करण्यात आल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. त्यामुळे आता आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार कलमात वाढ करण्यात आली आहे. तसेच आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.