पुणे : शिवसेनेतील नेते रामदास कदम यांचे भाऊ आणि आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.ईडीकडून त्यांना अटक केल्यानंतर आता त्यांना 15 मार्चपर्यंत त्यांना कोठडीही सुनावण्यात आली आहे. सदानंद कदम यांच्यावर कारवाई करण्यात आल्यामुळे आता या कारवाईला राजकीय वळण लागले आह.सदानंद कमद यांच्यावर कारवाई होताच ठाकरे गटाने आपला सगळा रोख आता रामदास कदम यांच्याकडे वळवला आहे.
ईडीकडून सदानंद कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी, ती कारवाई रामदास कदम यांच्यामुळे केली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सदानंद कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी रामदास कदम यांनीच पुढाकार घेतला असल्याची गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेवर टीका करताना एकनाथ शिंदे यांच्यसह त्यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. सदानंद कदम यांच्यावर कारवाई होण्यापाठीमागे खूप कारणं आहेत.
त्यामागील पहिलं कारण आहे ते म्हणजे रामदास कदम. त्यांच्या कटकारस्थानामुळेच सदानंद कदमांवर कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
ज्यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानावर सभा झाली त्यावेळी रामदास कदम प्रचंड अस्वस्थ झाले होते.
त्यामुळेच रामदास कदम यांनी आपल्या भावावर त्यांनी डाव साधला असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. खेडमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व सभेनंतर कोकणातील शिवसेनेचे सगळेच नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच सदानंद कदम यांना त्याचा फटका बसला असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
योगेश कदम यांच्या वडिलांनी म्हणजे रामदास कदम यांनी 50 खोक्यांसाठी पक्षासाठी गद्दारी केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी रामदास कदम यांच्यावर केला आहे. सदानंद कदम यांच्यावर सूडाच्या भावनेने कारवाई केली असून त्यांना आयुष्यातून उठवण्याचं काम रामदास कदम यांनी केले असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
त्यामुळे या प्रकरणात मी हे 1 लाख 1 टक्के रामदास कदमांचा हात असल्याचे विश्वासाने सांगत आहे असंही सुषमा अंधारे यांनी केले आहे.
सदानंद कदम हे ज्या प्रमाणे रामदास कदम यांचे बंधू आहेत. त्याच प्रमाणे त्या ते अनिल परब यांचेही निकटवर्तीय आहेत. त्यामुळे योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये जाईल म्हणून ते तिकडे जाऊन बसले असतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळेच या कारवाईत रामदास कदमांचाच हात असल्याचा माझे ठाम मत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपाची आणि गद्दार गटाची गाळण उडाली आहे.
त्यामुळे त्यांनी आमच्यावर गर्दी जमवायचा आरोप झाला तरी आम्ही जिथं उभं राहतो तिथं गर्दी होते काल आशिर्वाद यात्रेत 500 चं लोक होती असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी भाजप आणि रामदास कदम यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाल्यामुळे आता रामदास कदमांना झोप येणार नाही कारण त्यांच मन त्यांना खात राहिलं असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.