ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीचा या पक्षाला बसणार फटका, विश्लेषकांचा अंदाज काय
वंचित हे महाविकास आघाडीसोबत आले तर नक्कीच याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल.
पुणे : उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याशी वंचितशी युती करण्याबाबत चर्चा केली. यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक म्हणाले, शिवसेना ही भाजपपासून दूर गेली, याला फार मोठा अर्थ आहे. यामुळं महाराष्ट्राचं राजकारण आमुलाग्र बदललं आहे. शिवसेना आणि भाजप हासुद्धा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. दोघांनी युती केली. त्यानंतर ते सत्तेत आले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला. हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं वेगळ्या समिकरणांची नांदी होती. आता वंचित बहुजन आघाडीचा घटक मोठा आहे. प्रकाश आंबेडकर यांचं स्वताचं एक वलय आहे. वंचितचा आपला एक मतदार आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये वंचितचा मतदार लक्षणीय असल्याचं आपण पाहीलं. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा हरल्या. कारण त्यात वंचित बहुजन विकास आघाडीचा मोठा वाटा होता.
वंचित बहुजन आघाडीची मोठी व्होट बँक आहे. जर शिवसेना आणि वंचित हे दोन पक्ष एकत्र आले तर ही मतं महाविकास आघाडीच्या पराड्यात येतील.
महाविकास आघाडीची मतं वाढतील. यामुळं भाजपची मतं कमी होतील. वंचितची मतं ही भाजपविरोधी आहे, असं मानायला जागा आहे. त्यामुळं वंचित बहुजन विकास आघाडीचा रोल हा वंचितचा होता की काय असं अनेक अभ्यासकांना वाटतं.
वंचितनं महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढविली तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला नक्कीचं होईल. भाजपला त्याचा फटका बसू शकतो. परंतु, महाविकास आघाडी आणि वंचित यांच्या एकत्र येण्यात काही अडचणी असू शकतात. त्यामुळं त्यात कितीपत यश येत हे सांगणं कठीण आहे.
पण, वंचित हे महाविकास आघाडीसोबत आले तर नक्कीच याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल. याचा फटका भाजपला बसेल, असं मत राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केलं.