Deccan queen : पुणे-मुंबई प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनला झाली 92 वर्षे पूर्ण; केक कापून वाढदिवस साजरा

रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते, ज्याला ‘दख्खनची राणी’ (दख्खन की रानी) असेही म्हटले जाते. 1 जून 1930 रोजी महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ची सुरुवात झाली.

Deccan queen : पुणे-मुंबई प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनला झाली 92 वर्षे पूर्ण; केक कापून वाढदिवस साजरा
डेक्कन क्वीन एक्स्प्रेसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 12:40 PM

पुणे : पुणे-मुंबई प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन (Deccan Queen) 92 वर्षांची झाली आहे. यानिमित्त पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापण्यात आला. यावेळी इंजिनचे पूजन करण्यात आले. तसेच चालकाचा सत्कारदेखील करण्यात आला. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक एस. सी. जैन यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी यावेळी उपस्थित होते. 1 जून 1930 रोजी महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ची सुरुवात हा मध्य रेल्वेचा (Central Railway) अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील 2 महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते, ज्याला ‘दख्खनची राणी’ (दख्खन की रानी) असेही म्हटले जाते.

डब्यांची संख्या सध्याच्या 17 डब्यांच्या पातळीपर्यंत वाढवली

सुरुवातीला, ही ट्रेन प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह सादर करण्यात आली होती, ज्यापैकी एक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसरी सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगाने रंगवलेला होता. मूळ रेकच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्स इंग्लंडमध्ये बांधण्यात आल्या होत्या तर कोचच्या बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये बांधण्यात आल्या होत्या. डेक्कन क्वीनमध्ये सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती. 1 जानेवारी 1949 रोजी प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली आणि द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली, जी जून 1955पर्यंत चालू राहिली जेव्हा या ट्रेनमध्ये प्रथमच तृतीय श्रेणी सुरू करण्यात आली. हे नंतर एप्रिल 1974 पासून द्वितीय श्रेणी म्हणून पुन्हा नियुक्त केले गेले.

neelam gorhe

डेक्कन क्वीनच्या वाढदिवसानिमित्त केक कापताना नीलम गोऱ्हे, हर्षा शहा आणि इतर

आरामदायी प्रवासासाठी केले बदल

मूळ रेकचे डबे 1966 मध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर येथे बांधलेले अँटी-टेलिस्कोपिक स्टील बॉडीच्या इंटिग्रल कोचेस मध्ये बदलण्यात आले. या डब्यांमध्ये उत्तम आरामदायी प्रवासासाठी बोगींचे सुधारित डिझाइन आणि आतील सजावट आणि फिटिंग्जमध्ये सुधारणा समाविष्ट केल्या आहेत. अधिक क्षमता वाढविण्यासाठी रेकमधील डब्यांची संख्या देखील मूळ 7 डब्यांवरून वाढवून 12 करण्यात आली होती. कालांतराने ट्रेनमधील डब्यांची संख्या सध्याच्या 17 डब्यांच्या पातळीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवाशांच्या अपेक्षा

सुरुवातीपासूनच, प्रवाशांना उच्च दर्जाच्या आरामदायी सुविधा पुरवण्याव्यतिरिक्त, ट्रेनमध्ये भारतात प्रथमच रोलर बेअरिंग असलेल्या डब्यांची सुरुवात, एंड ऑन जनरेशन कोचेस 110 व्होल्ट प्रणालीसह सेल्फ जनरेटिंग कोचेसमध्ये बदलणे, प्रवाशांना वाढीव क्षमता प्रदान करीत प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या चेअरकारला सुरुवात यासारख्या विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. या ट्रेनसाठी रंगसंगती म्हणून खिडकीच्या पातळीच्या वर असलेल्या लाल पट्ट्या सह क्रीम आणि ऑक्सफर्ड निळ्या रंगाची विशिष्ट रंगसंगती स्वीकारण्यात आली. चांगल्या सुविधा, आरामदायी दर्जा आणि सेवेचा दर्जा उत्तम यांसाठी प्रवासी जनतेच्या सतत वाढत चाललेल्या आकांक्षांसह, डेक्कन क्वीन ट्रेनमध्ये संपूर्ण बदल करणे आवश्यक मानले गेले.

1995मध्ये करण्यात आला बदल

– सर्व नवीन उत्पादित किंवा सुमारे एक वर्ष जुने, एअर ब्रेक कोच. – जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता प्रदान. तसेच 9 – द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता प्रदान. अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता प्रदान केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे. – डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा देते आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

deccan queen 1

डेक्कन क्वीनला झाली 92 वर्ष

वाहतुकीचे माध्यम नाही तर संस्था

डेक्कन क्वीन (दख्खन की रानी) चा इतिहास अक्षरशः दोन शहरांची कहाणी आहे. डेक्कन क्वीनच्या वेळेवर निघून वेळेवर पोहोचण्याच्या अचूक रेकॉर्डमुळे दोन्ही शहरांतील जनता आनंदी आहे. गेल्या 92 वर्षांच्या रंगीबेरंगी इतिहासात, ट्रेन दोन शहरांमधील वाहतुकीचे केवळ माध्यम न राहता एक संस्था म्हणून विकसित झाली आहे ज्याने अत्यंत निष्ठावान प्रवाशांची पिढी बांधली आहे.

सध्याची संरचना :

15.8.2021पासून सुरू करण्यात आलेल्या विस्टाडोम कोचच्या संलग्नतेसह, सध्या डेक्कन क्वीनची क्षमता 17 कोचची आहे ज्यामध्ये एक विस्टाडोम कोच, 4 एसी चेअर कार, 9 द्वितीय श्रेणी चेअर कार आणि 2 द्वितीय श्रेणी चेअर कारसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक पॅन्ट्री कार यांचा समावेश आहे.

LHB डबे :

रेल्वेने ट्रेन क्रमांक 12123/12124 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे सर्व पारंपरिक डबे एलएचबी कोचने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. LHB कोचची सुधारित रचना असलेली ट्रेन आता दिनांक 22.06.2022 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणि दिनांक 23.06.2022पासून पुणे येथून धावेल.

सुधारित संरचना : चार एसी चेअर कार, 8 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.