Pune crime : पुण्याच्या विश्रांतवाडीतल्या खाणीत सापडले दोघांचे मृतदेह; चार दिवसांपासून होते बेपत्ता, नातेवाईक म्हणतात…

विश्रांतवाडी पोलीस त्याचप्रमाणे अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्हीही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, हे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Pune crime : पुण्याच्या विश्रांतवाडीतल्या खाणीत सापडले दोघांचे मृतदेह; चार दिवसांपासून होते बेपत्ता, नातेवाईक म्हणतात...
सुशांत बडदे/विकी लंके
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 4:12 PM

पुणे : विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील खाणीत काल दोन तरुणांचे मृतदेह सापडले होते. या मृतदेहांची ओळख आता पटली आहे.. मागील चार दिवसांपासून ते बेपत्ता होते. या दोघांचेही मृतदेह (Deadbodies) या खाणीत आढळून आले आहेत. दोघेही तरूण एकमेकांना ओळखत होते. ते एकमेकांचे मित्र होते, अशी माहिती समोर आली आहे. विकी प्रकाश लंके (वय 20), सुशांत सचिन बडदे (वय 21, दोघेही रा. विश्रांतवाडी) अशी मृतदेह सापडलेल्या तरुणांची नावे आहेत. आता या दोघांचेही मृतदेह सापडल्याने त्यांचा खून (Murder) झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या दोघांच्या मृत्यूचे कारण समजणार आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार

विकी आणि सुशांत हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. ते विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहत होते. विकी लंके हा सराईत गुन्हेगार होता. दोघेही बुधवारी रात्री बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेतला गेला, मात्र सापडून न आल्याने अखेर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. हा तपास सुरू असतानाच शनिवारी दुपारी विश्रांतवाडी परिसरातीलच एका खाणीतील पाण्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हे सुद्धा वाचा

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात

विश्रांतवाडी पोलीस त्याचप्रमाणे अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्हीही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, हे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दुसरीकडे सुशांत बडदे आणि विकी लंके हे दोघेही चार दिवसांपूर्वीच बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोघांचेही शनिवारी मृतदेह आढळल्याने त्यांचा खून झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सध्या तरी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच या दोघांच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.