पुणे – शहरातील खडकवासाला धरणाच्या(Khadakvasala Dam) मागच्या बाजूस दोन तरुणाचे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. खडकवासला धरणाजवळ असलेल्या या मोऱ्यांमध्येही हे मृतदेहआढळून आले आहेत. धरणाच्या पाण्यात परिसरातील नागरिक (Citizen )कायमच कपडे धुण्यासाठी जात असतात. घटना उघडकीस आली त्यावेळी काही लोकांना मोऱ्यांमध्ये तरुणाचे मृतदेह तरंगताना आढळून आले. नागरिकांनी या या घटनेची माहिती धरणावर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक(Security guard) दिली. त्यानंतर त्यांने घटना स्थळावर धाव घेतली. विजय नागनाथ रोकडे (वय23 रा.रामनगर माळवाडी) आणि रॉबिन कुबेर वाघमारे (वय23 बराटे चाळ माळवाडी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही दोन दिवसापासून गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाण्यावर मृतदेह तरंगताना बघून स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विजय नागनाथ रोकडे आणि रॉबिन कुबेर वाघमारे दोघेही मित्र होते . गेल्या दोनदिवसांपूर्वी ते घरातून एकत्रित बाहेर पडले होते. मात्र पुन्हा ते घरी आलेचा नव्हते. त्यानंतर धरणात पोहताना या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिस स्टेशनचे पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान घटना स्थावर दाखल झाले. त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशामक केंद्राचे अधिकारी सुजित पाटील वाहनचालक अभिषेक गोणे, ओंकार इंगवले, फायरमन पंकज माळी, किशोर काळभोर, योगेश मायनाळे, अक्षय काळे, शुभम मिरगुंडे, शुभम माळी यांनी दोघांना पाण्याबाहेर काढले.
धरणात आढळलेल्या दोन्ही तरुणांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मृतदेहाच्या सोबत मिळालेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतलया आहेत . सद्यस्थितीला पोलिसांनी दोघांचा मृत्यू पोहताना बुडाल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र याव्यतिरिक्त काही कारण आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
‘आज गांधी, नेहरू, आझाद यांच्या सारख्यांवर टीका करण्यात धन्यता मानणारं नेतृत्व’, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
Punjab National Bank : उत्तर प्रदेशात पंजाब नॅशनल बँकेवर जबरी दरोडा; रिव्हॉल्व्हरच्या धाकाने 10 लाख लुटले