Ajit Pawar| शहरातील जम्बो कोविड सेंटर बंद करणार; ‘या’ तारखेपासून नर्सरी, छोटा, मोठा वर्ग सुरु होणार – अजित पवार
येत्या 2 मार्चपासून नर्सरी, छोटा गट व मोठ्या गटा चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षणास सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्ष शिक्षणाप्रमाणे ऑनलाईन शिकवता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी शाळेत जाणे विसरून गेले आहेत. त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावणे आवश्यक आहे.
पुणे – शहरातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर बंद(Jumbo Covid Center) करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जम्बो कोविड सेंटरमधील उपकरणांचा उपयोग करावा लागला नाही. शहरातील रुग्णांची संख्या घटली असली तरी पूर्वीसारखा लसीकरणास (vaccination)नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र असे न करता ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांनी लस घ्यावी असे मत व्यक्त केले आहे.
We have decided to close the two COVID19 Jumbo hospitals in Pune district from 28th Feb. These medical facilities were not used during the third wave of COVID19: Maharashtra Deputy CM Ajit Pawar after a review meeting in Pune
— ANI (@ANI) February 26, 2022
2 मार्चपासून नर्सरी, छोटा वर्ग सुरु होणार
येत्या 2 मार्चपासून नर्सरी, छोटा गट व मोठ्या गटा चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षणास सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्ष शिक्षणाप्रमाणे ऑनलाईन शिकवता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी शाळेत जाणे विसरून गेले आहेत. त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांना शनिवार आणि रविवारी ही वर्ग घ्यावेत. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी लातूर पॅटर्न राबवाव लागणारअसेही ते म्हणाले आहेत. कोरोना काळात तुम्हांला घरी बसवून पगार देत होतो, काही जण काम करत होते मात्र काही जण दांडी मारत होते.
शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे
माझ्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला असता तर चांगलं झालं असत. मला मुलांचाही सत्कार केला जाणार आहे असे, सांगितलं गेलं. मी आलो तेंव्हापासून पाहतो, येथे केवळ शिक्षक आहेत. नंतर कधी सत्कार करणार तुमचा कार्यकाळ 21 मार्चला संपणार आहे. असे विचारात आयोजकांची फिरकीही त्यांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांचे मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत नाहीत, जो पर्यत आम्ही गुणवत्ता सुधारणार नाही, तोपर्यत आम्ही पालकांना कसं सांगणार. तुमचे मुले पाठवा म्हणून असा टोलाही त्यांनी शिक्षकांना लगावला आहे. विज्ञानाची कास धरली पाहिजे. कुठलाही पुरस्कार हा गुणवत्तेवर दिला गेला पाहिजे, मी बारामतीचा आहे म्हणून तेथील शिक्षकांना गुणवत्ता नसेल तर द्यायचं नाही . विश्वासहर्ता संपली की माणूस बिनकामाचा होतो.
औरंगाबादेत जखमी अवस्थेतील दुसऱ्याही बिबट्याने घेतला अखेरचा श्वास ; वन्यप्रेमींमध्ये हळहळ जेवणाने बहिणींना गिळलं, विषबाधेने दोन चिमुकल्या दगावल्या, आई आणि बाळ गंभीर
VIDEO: सरकारने शब्द पाळला नाही, उपोषणाशिवाय पर्यायच नव्हता; खासदार संभाजी छत्रपतींचं उपोषण सुर