पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची (Pre-service examination) अंतिम उत्तर तलिका जाहीर केला आहे. राजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करताना आयोगाने गोंधळ घातला आहे. आयोगाकडून चक्क 8 प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. आठ प्रश्न आयोगाने रद्द केल्याने परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने रद्द केलेल्या गुणांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून यामुळे गुंणाचे नुकसान होणार आहे. गेल्या वेळी पीएसआय, एसटीआयच्या पूर्व परीक्षेत आयोगाकडून चुकीची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली होती. असा विद्यार्थ्यांचा आरोप होता, या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयीन (Court) लढाई लढली, असे असून देखील आयोगाकडून चुका वाढत जात आहे, 100 पैकी 8 प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होणार आहे असा आरोप विद्यार्थी करता आहेत. आयोगाच्या या निर्णयाचा फटका जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे.
जा.क्र. 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/BKqz2NmULB. https://t.co/a2cq9QZ049.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 23, 2022
या पदांसाठी घेण्यात आल्या होत्या परीक्षा
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी. कक्ष अधिकारी, डिवायएसपी अशा एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. माफक हीच अपेक्षा आयोगाने चुका कमी करून अचूक प्रश्न प्रश्पत्रिका तयार कराव . तर यासारख्या चुका टाळल्या जातील. याबरोबरच आयोगाने रद्द करण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्न साठी 1 गुण देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
AAP MVA : आप आमदार की आघाडी सरकार? एकीकडे आमदारांना मुंबईत 300 घरं, दुसरीकडे 1 रुपया
Gold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या, चांदीचे भाव