पुणे : आंबेगाव तालुक्यातील गोहे येथील आदिवासी आश्रमशाळे (Ashram School)तल्या 41 विद्यार्थिनींची प्रकृती (Health) अचानक खालावली आहे. सर्व विद्यार्थीनी आजारी असून, त्यांना पायाला मुग्या येणे चक्कर आणि सर्दी खोकला ही लक्षणे आहेत. सर्व मुलींना उपचारा (Treatment)साठी मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर काही मुलींना बरे वाटले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. वातावरणातील बदलामुळे मुलींना हा त्रास झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही मुलींची तब्येत अद्याप अस्वस्थ असून, डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.
आंबेगाव तालुक्यातील गोहे येथील आदिवासी आश्रमशाळेतल्या 41 विद्यार्थीनी अचानक त्रास होत असल्याने सर्व मुलींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळेत 450 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. दुपारच्या सुमारास अचानक दोन मुलींना चक्कर आल्याने त्यांना डिंभे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर अजून 39 मुलींना चक्कर, खोकला, सर्दी, ताप ही लक्षणे दिसून आली आणि त्यांना त्रास व्हायला लागला. यानंतर त्यांनाही घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अजून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये 9 मुलींवर उपचार सुरू असून, मंचर उपजिल्हा रुग्णालयात 2 मुलींवर उपचार सुरु आहेत. वातावरणातील बदलांमुळे या मुलींना त्रास होत असल्याचे घोडेगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे. ज्या मुलींना उपचारानंतर बरे वाटले आहे, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ज्या मुलींना अस्वस्थ वाटत आहे, त्यांच्यावर पुढील उपचार करून घरी सोडण्यात येणार आहे. (The condition of 41 female students of tribal ashram school in Ambegaon suddenly deteriorated)