उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याचा निर्णय, पुण्यात भाजपकडून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न?
आम्ही कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत नाही. पण, जो इतिहास आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता माफ करणार नाही.
पुणे : पुण्यात भाजपकडून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. येरवडा येथील उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. धर्मवीर आहेत आणि धर्मवीर राहतील. या पुलाचं नावदेखील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं ठेवण्यात येणार आहे. या नावाला कोणी विरोध केला तर आम्ही जुमानणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं असलेला हा पूल त्यांना देण्यात आलेली उपाधी कोणी काढू शकत नाही. आनंदाचा क्षण आहे.
उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्धाटन होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली.
इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये
उद्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे. लोकांना याचा उपयोग होणार आहे. जगदीश मुळीक यांनी सांगितलं की, आम्ही कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत नाही. पण, जो इतिहास आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता माफ करणार नाही.
भाजपाकडून अजित पवार यांचा निषेध
अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांनी जाहीरपणे या विषयाची माफी मागितली पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे.
या विषयावर अजित पवार ठाम आहेत. त्यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वातंत्र्यरक्षक होते, असं म्हटलं. भाजपाने या वक्तव्याचा आधी निषेध केला. आंदोलने केली. आता तर उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं नाव देऊन एकंदरित अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.