रणजित जाधव, मावळ : महाराष्ट्रात राजकीय (Maharasht Politics) गोष्टी अधिक चर्चील्या जातात. महाराष्ट्रातल्या एखाद्या लहान मुलाला राजकारणात बाबत एखादी गोष्ट विचारली तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोंडी प्रचंड वेग आला आहे. काल मावळ (Pune Maval) तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी घेतलेली निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ओळखपत्र हातात घेऊन मतदान केलं आहे. मावळातील मळवंडी ठुले या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही निवडणूक झाली आहे. आता ही निवडणूक (Election Process) शिक्षकांनी का घेतली असा अनेकांना प्रश्न पडला असेल ?
मावळातील मळवंडी ठुले या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणुकीची ओळख व्हावी, निवडणुका आपल्या देशात कशा पद्धतीने होतात? याची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी मावळ मधील शाळेत निवडणूक घेण्यात आली. निवडणुकांचे प्रात्यक्षिक करत यावेळी विद्यार्थ्यांनी हातात प्रतिकात्मक मतदान ओळखपत्र घेत मतदानाचा हक्क बजावला. ज्यावेळी हे सगळं सुरु होतं त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचं आनंद पाहायला मिळाल्याचं शिक्षक सांगत आहेत. त्याचबरोबर केलेल्या प्रयोगामुळं विद्यार्थ्यांना निवडणूक कशी होते हे सुध्दा समजलं आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांना निवडणुक ही प्रक्रिया काय असते. त्याचबरोबर एखादा उमेदवार कसा निवडून येतो. या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित व्हाव्यात यासाठी निवडणूक प्रक्रिया शाळेत घेण्यात आली होती. प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना कळावी याची काळजी शिक्षकांनी घेतली. या उपक्रमामुळे पालकवर्ग देखील खूष झाला आहे. त्याचबरोबर पालकांनी शिक्षकांचं कौतुक देखील केलं आहे.
प्रत्येक शाळेत असा उपक्रम घेण्यात यावा अस मतं पालकांनी तिथं व्यक्त केलं. कारण या उपक्रमामुळे मुलांना अधिक माहिती मिळत आहे. त्याचबरोबर मुलांच्या ज्ञानात सुध्दा भर पडत आहे. जिल्हा परिषद शाळेत अशा पद्धतीचे उपक्रम राबविले तर त्याचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल.
सध्याची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे लोकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत अशा पद्धतीचे चांगले उपक्रम व्हावेत अशी सुध्दा इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीचे उपक्रम झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.