आंब्याच्या पेटीची किंमत स्मार्टफोन एवढी, यंदाच्या हंगामाचा पहिली पेटी पुण्यात दाखल झाली हो…
ज्याची आपण सर्वसामान्य चाहते उन्हाळ्यात वाट पहात असतो. तो फळांचा राजा हापूस आंबा यंदा महिनाभर आधीच बाजारात दाखल झाला आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या आंब्याच्या पेटीची किंमत तुमच्या स्मार्टफोन एवढी आहे. तेव्हा विचार करा....
पुणे | 18 जानेवारी 2024 : फळांचा राजा आंबा सर्वांना हवासा वाटतो. हापूस आंब्याची सुमधूर चव सर्वांच्या जीभेवर रेंगाळते आणि त्याचा मनमोहक सुवास उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात खऱ्या अर्थाने दरवरळतो. परंतू आंब्याची लागवड लवकर केली जात असल्याने मोसमातील पहिले फळ लवकर दाखल होते. अर्थात हा आंबा सर्वांच्या आवाक्यातला नसतो. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. त्याची व्यापाऱ्यांनी बाजारात विधीवत पूजा देखील केली. परंतू या आंब्याच्या पेटीची किंमत ऐकून तुमच्या तोंडचे पाणी पळेल…
आंब्याच्या बागांमध्ये सध्या हवामान पोषक आहे. मोसमातील पहिली फळे परदेशात पाठविण्यासाठी आधीच तयार केली जातात. पुण्यात हापूस आंब्याची या हंगामाची पहिली पेटी दाखल झाली आहे. या मानाच्या फळाची किंमत अधिक आहे. पुण्याच्या मार्केट यार्डातील बाजारात हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या आंब्याच्या पेटीची व्यापाऱ्यांनी पूजा केली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. सध्याचे वातावरण आणि हवामान आंब्याला पोषक असल्याने आंबा लवकर बाजारात दाखल झाल्याचे म्हटले जात आहे.
पाहा किंमत किती आहे ?
पावस गावातील शेतकरी सुनील यांच्या बागेतून यंदाच्या मोसमातील पहिला आंबा पुण्याच्या मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर दाखल झाला आहे. ही रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी असून हिला पाहयला व्यापारी आणि ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. मानाच्या या पहिल्या हापूस आंब्याच्या पेटीची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये इतकी आहे. यंदा महिनाभर आधीच पहिल्या हापूस पुण्यात दाखल झाला आहे.