Pune crime : कल्याणीनगरात टोळक्याची दहशत, एसआरए कॉम्प्लेक्समधल्या वाहनांची केली तोडफोड

वाहनांची तोडफोड (Vandalized vehicles) केल्याचा प्रकार पुण्यात झाला असून कल्याणीनगरात (Kalyani Nagar) वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. येथील मुळीक कॉम्प्लेक्समधील एसआरए बिल्डिंगमध्ये (SRA complex) ही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

Pune crime : कल्याणीनगरात टोळक्याची दहशत, एसआरए कॉम्प्लेक्समधल्या वाहनांची केली तोडफोड
कल्याणीनगरातील एसआरए कॉम्प्लेक्समध्ये टोळक्यानं केली वाहनांची तोडफोडImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:19 AM

पुणे : वाहनांची तोडफोड (Vandalized vehicles) केल्याचा प्रकार पुण्यात झाला असून कल्याणीनगरात (Kalyani Nagar) वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. येथील मुळीक कॉम्प्लेक्समधील एसआरए बिल्डिंगमध्ये (SRA complex) ही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पहाटे पावणेचारच्या सुमारास अज्ञात तरुणांनी पार्किंगमध्ये घुसून तोडफोड केली आहे. यामध्ये चारचाकी, रिक्षा, आपे तसेच दुचाकींची मोठ्या हत्यारांनी तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात पाच ते सहा तरूण मुले होती. त्यांनी त्यांच्या गाड्या गेटच्या बाहेर लावल्या होत्या. त्यांनी मद्यपान केलेले होते. त्यांच्या हातात हत्यारे तसेच बिअरच्या बाटल्याही होत्या. आत घुसल्यानंतर त्यांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली, असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पहाटे साडे चार ते पाचदरम्यान हा प्रकार घडला आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

त्यांच्या हातात मोठमोठी हत्यारे होती. हातात बिअरच्या बाटल्या होत्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा टोळक्यावर त्वरीत कारवाई करावी, त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. असे प्रकार वारंवार होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. एक बुलेट आणि एक अॅक्टिव्हा अशा दोन दुचाकींवर ते आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा :

Pimpri Chinchwad crime| पिंपरी पोलिसांची शक्कल ; चोरांच्या मदतीनेच उलगडल्या दहा घरफोड्या घटना

म्हाडाच्या परीक्षेत पुन्हा गैरप्रकार? परीक्षा केंद्रावरील गडबडीचा Video समोर; MPSC समन्वय समितीचा गंभीर आरोप

Satish Uke ED Raid : फडणवीसांचा विरोध, पटोलेंशी जवळीक, राऊतांची भेट, सतीश उकेंना नेमकं काय काय भोवलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.