New variant of Omicron|ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीयंटनं चिंता वाढवली; पुण्यात ओमिक्रॉनचे बी ए 2 चा लहान मुलांना संसर्ग
सद्यस्थितीला युरोपमध्ये ओमिक्रॉनचा बी ए 1 हा सब व्हेरियंट हा धुमाकूळ घालतो आहे. आपल्याकडे बी ए 2 चे रुग्ण आढळून आले आहेत. यावर अजूनही संशोधन सुरु आहे. नवीन व्हेरियंत किती धोकादायक आहे. याची माहिती व्हायची आहे.परंतु बी ए 1 व बा ए 2 मधील अनेक गोष्टीमध्ये साम्य आढळून आले आहे. या व्हेरियंटचा संसर्ग ज झाल्यानंतर घश्यात दुखते, डोके दुखणे, त्यानंतर लहान मुलांना हातपाय दुख
पुणे – पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये(children ) ओमिक्रॉनचे बी ए 2 चा उपप्रकार आढळून आला आहे. 6 वर्षाच्या आतील चार मुलांचे अहवाल जिनोमिक सिक्वेंसिगसाठी(Genomic sequencing) एन आयव्हीला पाठवले होते. पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर (Pediatrician Dr. Nilesh Gujar)यांनी चार मुलांचे अहवाल पाठवले होते. दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार आढळून आला आहे . ओमिक्रॉनचा व्हेरीयंट बदलायला सुरुवात झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ओमिक्रॉनचा बी ए 2 व्हेरियंटची लक्षणे भारतात कोरोनाचा धुमाकूळ अद्यापही संपलेला नाही. इतकंच नव्हेतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. याचा काळात माझ्या क्लीनिक काही पॉझिटिव्ह पेशंट आढळले, त्यानंतरमी एन आयव्हीहिच्या पोतदार मॅडमला विनंती केले की आपण याचे जिनोमिग सिक्वेन्स करूया का? त्यांनीही यासाठीतात्काळ परवानगी दिली. ज्या चार रुग्णांचे जिनोमिग सिक्वेन्स केल्यानंतर असे आढळून आले कि त्या चारही जणांच्यामध्ये ओमिक्रॉनचा बी ए 2नावाचा व्हेरियंट आढळून आला. सद्यस्थितीला युरोपमध्ये ओमिक्रॉनचा बी ए 1 हा सब व्हेरियंट हा धुमाकूळ घालतो आहे. आपल्याकडे बी ए 2 चे रुग्ण आढळून आले आहेत. यावर अजूनही संशोधन सुरु आहे. नवीन व्हेरियंत किती धोकादायक आहे. याची माहिती व्हायची आहे.परंतु बी ए 1 व बा ए 2 मधील अनेक गोष्टीमध्ये साम्य आढळून आले आहे. या व्हेरियंटचा संसर्ग ज झाल्यानंतर घश्यात दुखते, डोके दुखणे, त्यानंतर लहान मुलांना हातपाय दुखणे अशी लक्षणे आढळून येत असल्याची माहीती बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी दिली आहहे.
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती काय सांगते
जिल्ह्यात मागील आठवड्यात 90 हजार 137 नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील 109 टक्के लाभार्थ्यांनी लशीची पहिली मात्रा तर85 टक्के लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या २३ टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून 75 लक्ष 92 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहितीही दिली.
सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली