Bhor electricity issue : नागरिकांच्या संयमाचा अंत! वीज गायब झाल्यानं मध्यरात्री वीजनिर्मिती केंद्रात धडक
विविध मागण्यांसाठी देशभरातले वीज (Electricity) कर्मचारी (Employees) संपावर (Strike) आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. भोरमधील नागकारिही हैराण झाले आहेत. त्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
पुणे (भोर) : विविध मागण्यांसाठी देशभरातले वीज (Electricity) कर्मचारी (Employees) संपावर (Strike) आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. भोरमधील नागकारिही हैराण झाले आहेत. त्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला. भोर परिसरातली संध्याकाळच्या सुमारास गेलेली वीज मध्यरात्रीपर्यंत न आल्याने नागरिकांनी थेट मध्यरात्री 1 वाजता वीजनिर्मिती केंद्र गाठून गेलेली वीज चालू करण्यास भाग पाडले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. एकीकडे वीजपुरवठा बंद करून सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. दुसरीकडे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवल्याने नागरिकांचाही संयमाचा बांध फुटला. नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. यावेळी नागरिक आक्रमक झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करत वाद मिटवावा लागला.
नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप
महावितरणाच्या अडमुठ्या भूमिकामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांनी तीव्र संतापही व्यक्त केला. 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच दवाखान्यात असलेल्या रुग्णांना होणाऱ्या त्रासाला जवाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला.
#Bhor : भोर परिसरातली संध्याकाळच्या सुमारास गेलेली वीज मध्यरात्रीपर्यंत न आल्यानं नागरिकांनी थेट मध्यरात्री 1 वाजता वीजनिर्मिती केंद्र गाठून गेलेली वीज चालू करण्यास भाग पाडलं. #Pune #electricityproblem #Video #MSEDCL अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/gxkKOsEOqJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2022