दूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू
राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली (Milk cost increase) आहे. यामुळे ऐन महागाईत ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
पुणे : राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली (Milk cost increase) आहे. येत्या सोमवारी 16 तारखेपासून प्रती लीटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात येणार आहे. गाईच्या पॅकिंग दुधात ही दरवाढ करण्यात आली (Milk cost increase) आहे. महाराष्ट्र राज्य कल्याणकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ऐन महागाईत ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
दूध दरवाढीसंदर्भात नुकतंच कात्रज दूध संघात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला वेगवेगळ्या सहकारी आणि खासगी दूध संघाचे दीडशे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने हा दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात येत (Milk cost increase) आहे.
ऐन महागाईत दूधाच्या दरातही वाढ होणार आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. राज्यात दर प्रतिलीटर दूधामागे 2 रुपये वाढणार आहेत. राज्यामध्ये अंतर्गत वापरासाठी 85 लाख लिटर दूध पॅकिंग मध्ये विकलं जातं. या ग्राहकांना माञ या दूध दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.