पुणे : पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ (Pune District Co-Operative Housing Societies and Apartments Federation) या उन्हाळ्यात एका मिशन राबविणार आहे. सोसायट्यांना थकबाकीदारांच्या समस्येला सामोरे जाण्यास मदत करणे, हे ते मिशन असेल. त्यानुसार महासंघाने थकीत सोसायटीची थकबाकी वसूल करण्यासाठी सोसायट्यांना मदत करण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात जिल्हाभर विशेष कार्यक्रम आणि शिबिरांची (Camps) मालिका आयोजित केली आहे. महासंघ ही जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची सर्वोच्च संस्था आहे. देखभाल शुल्क भरणे हे सोसायटी सदस्यांचे मूलभूत कर्तव्य आहे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले. हे शुल्क वेळेवर भरल्याशिवाय कोणतीही सोसायटी काम करू शकत नाही. कारण ती त्यांच्यासाठी उत्पन्नाचा (Income) प्राथमिक स्रोत आहे. दरम्यान, जवळजवळ 99 टक्के सदस्य त्यांच्या पेमेंटसह नियमित असल्याचे समोर आले आहे.
बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांना ही समस्या कशी सोडवायची याची कायदेशीर माहिती नसते. तिथेच फेडरेशन पाऊल टाकते. बहुतेक प्रकरणे वैयक्तिक समस्यांमुळे होतात. अशा प्रकरणांमध्ये, आम्ही लोकांना समस्या सोडवण्याचा सल्ला देतो, परंतु वेळेवर या सर्व गोष्टी व्हायला हव्या, असे महासंघाचे म्हणणे आहे. क्रॉनिक डिफॉल्टर्सच्या बाबतीत, फेडरेशनकडे दोन वसुली अधिकारी आहेत, जे उपजिल्हा निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित थकबाकी वसूल करण्यात मदत करतात.
आत्तापर्यंत महासंघाने पाषाण, पिंपळे सौदागर, सहकार नगर आणि इतर भागात अशा आठ कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यामुळे सोसायट्यांना समस्येचे निराकरण करण्यात मदत होईल. 1 मे रोजी पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात महासंघाचे दुसरे कार्यालय सुरू होणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील विविध भागांतील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. येत्या महाराष्ट्र दिनी हे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या चिखली या भागात सुरू होत आहे.