हेमाडपंथी मंदिर झाले उघडे, पळसदेवकरांच्या जाग्या झाल्या जुन्या आठवणी, पर्यटकांची गर्दी

उजनी जलाशयातील पाणी सध्या मायनसमध्ये गेले आहे. त्यामुळे उजनीच्या पोटातील ऐतिहासिक शिल्पे दिसू लागले आहेत.

हेमाडपंथी मंदिर झाले उघडे, पळसदेवकरांच्या जाग्या झाल्या जुन्या आठवणी, पर्यटकांची गर्दी
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 8:53 PM

पुणे : हेमाडपंथी मंदिराचा काळ जरी निश्चित नसला तरी याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात “पलाशतीर्थ” म्हणून आढळून येते. या हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडाने केले आहे. शिखराची साप्तभूमी पद्धतीची बांधणी आहे. शिखरासाठी पक्क्या विटा, चुना इत्यादीचा वापर करून बांधले आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप गाभारा, उंच शिखर, लांब लांब शिळा विविध मदनिका, अलासकन्या, सूरसुंदरी,जलामोहिनी, नागकन्या मूर्ती, चौकोनी खांब ,वर्तुळाकृत्री पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात.

अती प्राचीन हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खलावल्याने उघडे पडले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किमीवर भीमानदीच्या पात्रात १९७५ साली जलसमाधी मिळाली होती. हे मंदिर 44 वर्षे हून अधिक काळ पाण्यात लाटांशी झुज देत आहे. सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झालीय.

अशा शिल्पा मूर्तांमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर-पार्वती, तीन विरगळी तसेच रामायण, महाभारातीलाही इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्प कला दिसतात. त्याकाळी केलेली अफलातून अप्रतिम कोरीव काम करून त्याची केलेली जडण घडण खरीच वाखानण्याजोगी आहे. उजनी जलाशयातील पाणी सध्या मायनसमध्ये गेले आहे. त्यामुळे उजनीच्या पोटातील ऐतिहासिक शिल्पे दिसू लागले आहेत.

या हेमाडपंथी पळसनाथ मंदिराची रचना पूर्णपणे फक्त २७ दगडी नक्षीदार खांबांपासून तयार केलेली दिसते, या मंदिराचा सभोवताली भव्य दगडी तट बंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तरीही तिचे आस्तित्व आजही असल्याचे दिसून येते.

सदर मंदिर 44 वर्षे पाण्यात लाटांशी झुज देत आहे. असे असतानाही आजदेखील चांगल्या आणि भक्कम स्थितीत उभे आहे. त्यामुळे हा मोठ्या कुतुहलाचा विषय बनला आहे. दरम्यान, सध्या भीमा नदी पत्रातील पाणी साठा आतिशय कमी झाला. त्यामुळे मंदिर पूर्णपणे उघडे पडत चालले आहे.

हे मंदिर उघडे झाल्यानंतर या मंदिरास पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तगण इतिहास प्रेमी, हेमाडपंथी तज्ज्ञ, पर्यटक आणि परिसरातील नागरिक गर्दी करतात.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.