Pune Crime| पुण्यात चोरट्यांचा प्रताप..सराफाच्या दुकानाशेजारी दुकान घेतले अन भिंतीला भगदाड पडत लांबवले किलोभर सोने

फर्निचरचे काम सुरु असल्याने चोरी होईल असा संशय कुणालाही नाही आला. याचाच फायदा घेत चोरट्यांनी माऊली ज्वेलर्स हे दुकान बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले. तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले आहेत.

Pune Crime| पुण्यात चोरट्यांचा प्रताप..सराफाच्या दुकानाशेजारी दुकान घेतले अन भिंतीला भगदाड पडत लांबवले किलोभर सोने
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 4:19 PM

पुणे – पुण्यात ज्वेलर्समध्ये चोरीचा (Theft in jewelers)अजब प्रकार घडला आहे. आतापर्यंत ज्वेलरीचे शटर तोडून , दिवसाढवळ्या दुकानात घूसून डोक्याला बंदूक लावून ज्वेलरी शॉप लुटल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मात्र नुकताच पुण्यात (Pune) ज्वेलरी शॉप चोरीचा चकित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये चोरट्यांनी चक्क ज्वेलरी शॉपच्या शेजारी दुकान खरेदी केले. त्या दुकानातून ज्वेलरी शॉपच्या भिंतीला भगदाड पडले, त्या भगदाडातून ज्वेलरीच्या दुकानात शिरत लाखो रुपयांचे सोने गायब केले आहे. शहरातील वारजे(Warje) परिसरातील इंडिया रोडवरील लक्ष्मी माथा येथील माऊली ज्वेलर्स ही घटना घडली आहे. या घटनेत सुमारे 1 किलो पेक्षा अधिक दागिन्यांची चोरी झाली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तर झाले असे की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटयांनी मागील काही दिवसापूर्वी चोरी झालेल्या सराफाच्या दुकानाशेजारी एक दुकान भाड्याने घेतले होते. तेथे त्यांना मसाल्याचे दुकान सुरु करायचे होते.  त्यामुळे त्यांनी  दुकानात फर्निचर चे काम सुरू केले होते.  नवीन दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरू  असल्याने चोरट्यांचा नागरिकांना संशय आला नाही.  शुक्रवारी दुपारी माऊली सराफ पेढी बंद होते.  याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले.  त्यानंतर  तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.  दुकानात काम सुरू असल्यामुळे भिंतीला भगदाड पाडत असल्याचा आवाज आला नाही.   जरी आवाज आला तरी काम सुरू असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे.   दरम्यान जेव्हा ज्वेलर्सचे मालक दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले.  घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेची पथके  व स्थानिक पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे.  एक किलो पेक्षा अधिक वजनाचे दागिने दुकानातून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.  भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दुकान भाड्याने घेणारे कोण आहेत ? त्यांनी ते कधी भाड्याने घेतले ? फर्निचरचे काम कोण करत होते ? नेमकी चोरी कोणी केली अशी विविध माहिती पोलिस घेत आहेत.

“मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत”, Vivek Agnihotri यांचा Arvind Kejriwal यांच्यावर पलटवार

थाली बजाव महागाई भगाओ, Congress कडून महागाई मुक्त भारत अभियान जाहीर

Aurangabad | शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात वंचित आघाडी आक्रमक, औरंगाबाद, परभणीत आंदोलन

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.