Video| देव तारी त्याला कोण मारी! तरुण आधी घोड्यावरून पडला मग बैलांच्या पायाखाली येता-येता वाचला
मराठीमध्ये एक म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यय खेडमध्ये पुन्हा एकदा आला आहे. धावत्या घोड्यावरून पडलेला तरुण थोडक्यात बचावला आहे.
पुणे : देव तारी त्याला कोण मारी अशी मराठीमधील (Marathi) एक प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. तरुण शर्यतीच्या घोड्यावर (Horse) बसला असताना तो घाटात भरधाव घोड्यावरून खाली पडतो, मात्र यातून तो सुखरूप वाचतो. मात्र त्यानंतर त्यांच्या पाठीमागून शर्यतीचे बैलं (Bulls) येत असतात त्यांच्या पायाखाली येता येता हा तरुण सुखरूप वाचतो. ही घटना आहे. खेडमधील बैलगाडा घाटातील. बैलगाडा घाटात एका तरुणाचा थोडक्यात जीव वाचलाय, बैलगाडा घाटात शर्यतीच्या घोड्यावर बसलेला तरुण वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावरून खाली कोसळला आणि थेट घोड्याच्या पायाखाली आला परंतू घोड्याच्या पायाखालून सुखरूप बाहेर निघल्यानंतर पाठीमागून वेगाने धावत येणाऱ्या शर्यतीच्या चावरेकरी बैलांच्या पायाखाली हा तरुण आला आणि या ठिकाणीही हा तरुण थोडक्यात वाचला आहे.
देवतारी त्याला कोण मारी! pic.twitter.com/po56RjNDkW
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 30, 2022
‘असा’ वाचला तरुण
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, हा तरुण शर्यतीच्या घोड्यावर बसलेला आहे. तो घोड्याने वेग घेतल्यानंतर खाली पडला. या अपघातामधून तो थोडक्यात बचावला. घोड्याच्या पायाखाली येता येता राहिला. मात्र यातून बचावल्यानंतर देखील त्याच्या पाठीमागू बैल येत होते. त्यांच्या पायाखाली हा तरुण सापडणार होता. मात्र यातून देखील हा तरुण सुखरुप बचावला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडातून फक्त एकच शद्ब बाहेर पडतात ते म्हणजे देव तारी त्याला कोण मारी. हा तरुण दोन्ही अपघातामधून सुखरूपपणे बचावला आहे.