सोने व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण, सव्वा दोन कोटीचे 4 किलो सोने लंपास
सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून आणि बेदम मारहाण करीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेगावजवळ सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून आणि बेदम मारहाण करीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी जत पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच पोलिसांची तीन पथके तपासाठी रवाना झाली आहेत. (Thieves stole 4 kg of gold from a gold trader in Sangali)
सोने व्यापारी बेळगावहून चार किलो सोने घेऊन नांदेडला निघाले असता रस्त्यातच चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यांत व्यापाऱ्याला बेदम मारहाण करत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून सव्वा दोन कोटीचे 4 किलो सोने लंपास केले. घडलेल्या घटनेने जत तालुका हादरला आहे.
आटपाडी तालुक्यातील पलसखेड सोने व्यापारी बाळासाहेब वसंत सावंत हे बेळगावहून चार किलो सोने घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून नांदेड येथे सोने देण्यासाठी निघाले होते. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास ते शेगाव जवळील माणेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या चार आज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण करून आणि डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील सव्वा दोन कोटीचे चार किलो सोने लंपास केले.
या प्रकरणी जत पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, एलसीबीचे अधिकारी यांनी भेट दिली आहे. तीन पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.
हे ही वाचा
भरदिवसा घरात घुसून सीएची हत्या; पालघरमध्ये खळबळ
लॉजवर बोलवून प्रेयसीची गळा दाबून हत्या, नाशिकमध्ये प्रियकराला बेड्या