…ही भाजपची काम करण्याची पद्धत, रोहित पवार यांचा घणाघात

काही लोकांना पुढं करायचं त्यांचं नाव खराब करायचं, ही भाजपची पद्धत आहे.

...ही भाजपची काम करण्याची पद्धत, रोहित पवार यांचा घणाघात
रोहित पवार यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 4:44 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर चांगलाच घणाघात केला. ते म्हणाले, गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला नेले जात आहेत. याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर फुटत आहे. याचा विचार व्हावा. महाराष्ट्र कमी पडतोय असं नाही. गुजरात जास्त पुढे पळतोय. हे प्रकल्प इथं आले असते तर रोजगार उपलब्ध झाले असते. छोटे मोठे उद्योग उभे राहिले असते, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. गुजरात निवडणूक जिंकावी म्हणून हा प्रकल्प तिकडे नेला जातोय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो पैशांवर लावण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, कोणाचाही फोटो लावा. त्यापेक्षा तरुणांच्या पोटाचं काय. विकासाबद्दल बोला. कामाबद्दल बोला. लोक आता हुशार झालीत, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

ओल्या दुष्काळावर रोहित पवार यांनी सांगितलं की, मागच्या वर्षी पेक्षा 116 टक्के पाऊस जास्त झालाय. मविआच सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं पत्र लिहिलं होतं. आता का ओला दुष्काळ जाहीर करत नाही, हे राजकारण नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीला लोकं स्वीकारत असतात. तेव्हा टीका केली जाते. असा शब्द वापरू नये. हे बरोबर नाही. याला अर्थ नाही. राजकारणाला खालच्या पातळींवर नेवू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले, रोहित पवार पोटात एक आणि ओठात एक असं बोलत नाही. हे मला चंद्रकांत पाटील यांना सांगायचं आहे. दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचे होते. ते तुम्ही गुजरातला नेले. त्याबद्दल बोला.

महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय. काही लोकांना पुढं करायचं त्यांचं नाव खराब करायचं, ही भाजपची पद्धत आहे, असा घणाघातही रोहित पवार यांनी केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.