Narayan Rane |’टीका करून जे गाजावाजा करत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात’ उदय सामंतांचा राणेंना टोला
सत्कार दोन प्रकारचे असतात. एक आदर्शवत सत्कार तर मते घेवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करवून घेतात. माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. हल्ली तर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहे. हि आपली संस्कृती नाही.
पिंपरी:- ‘जे टीका करतात ते आपल्या कर्मा ने मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीका ही करीत नाही. टीका करणाऱ्यां ना उत्तरही देत नाही. टीका करीत जे गाजावाजा करीत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात. असा असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) यांचे नाव न घेता लगावत पुढे ते म्हणाले कि, माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येवून दाखवा.असे खुले आव्हान दिले आहे. पिंपरी (Pimpri) येथील आयपीएस कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शब्द (पब्लिसिटी)संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्राइड ऑफ़ महाराष्ट्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
हि आपली संस्कृती नाही
परवाच सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी विद्यापीठास निधी देवू असे आश्वासन दिले होते.48 तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन केंद्रास 3 कोटी देण्याचा ठराव मंत्री मंडळात संमत करण्यात आला. सत्कार दोन प्रकारचे असतात.एक आदर्शवत सत्कार तर मते घेवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करवून घेतात. माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. हल्ली तर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहे. हि आपली संस्कृती नाही.हे कुठेतरी थांबले पाहिजेत. जांभेकर, टिळक यांनी पत्रकारितेचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर,पिंपरी चिंचवड शहर संघटक संतोष सौंदणकर, पुरस्कार सोहळ्याचे आयोजक शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Ranji Trophy 2022: अजिंक्य रहाणेचं दमदार शतक, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड होणार?