पुणे – शहारातील आरटीओ कार्यालयावर हजारोंच्या संख्येने एकत्र येत रिक्षा चालकांनी मोर्चा (Rickshaw drivers morchya) काढत ठिय्या आंदोलन केले . शहारत अवैधरित्या टॅक्सीतून होत असलेले प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन(Protest ) करण्यात आले होते. हे मागणी मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे. आरटीओ कार्यालयाच्या बाहेर रिक्षा चालकांनी मोठ्याने घोषणाबाजीही केली. या आंदोलनात बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलक रिक्षा चालकांनी दादा मला वाचवा या आशयाचे फलक घेऊन मोर्च्यात सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या (state Government) विरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
अजित पवारांनी दिले होते आश्वासन
शहरातील अवैध टॅक्सी 8 दिवसात बंद करू असा शब्द उपमुख्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी रिक्षा संघटनांना दिला होता. मात्र अद्यापही या निर्णयावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. शहरात अवैध पद्धतीनं टॅक्सीकडून होणारी प्रवासी वाहतूक तसेच शेअर दुचाकीव्रुऊन होणारी वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तब्बल 12 लाख रिक्षा चालक रस्त्यावर उतरतील इशाराही देण्यात आला आहे.
‘दादा क्या हुवा वो वादा’
अवैध रिक्षा बंद करण्याच्या मागणीसाठी शहारातील रिक्षा संघटनांनी सहा दिवसांपूर्वी शहरातील विधानभवन येथे मोर्चा काढत निदर्शने केली होती. डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी हा मोर्चा काढला होता. माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बेकायदा बाईक टॅक्सी 8 दिवसात बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या गोष्टीला आता एक महिना झाला तरी प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीही केले नाही. व प्रत्यक्षात बेकायदा बाईक टॅक्सी जोरात सुरू आहेत. असा आरोप बघतोय रिक्षावाला स संघटनेचे प्रमुख डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी केला होता. या मोर्च्याच्या वेळी आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालकांनी आता ‘ दादा क्या हुवा वो वादा ?’ असे म्हणत आंदोलन केले होते. “दादा क्या हुवा वो वादा” आणि “मेरा सरकार चोर है” असे टेम्पररी टॅटू हजारो रिक्षाचालकांनी बनवल्याचे समोर आले होते.
मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी