2 रुपयांच्या निधीसाठी 36 वर्षांपासून लढा, पुण्यातील दर्ग्याच्या पाठपुराव्याची अनोखी कहाणी

Pune | 2 रुपयांप्रमाणे 36 वर्षांचा निधी अडकला. 72 रुपयांचा निधीसाठी शाहादावल बाबा दर्ग्याला हजारो रुपयांचा खर्च

2 रुपयांच्या निधीसाठी 36 वर्षांपासून लढा, पुण्यातील दर्ग्याच्या पाठपुराव्याची अनोखी कहाणी
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 11:27 AM

पुणे : ‘4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण हीच म्हण पुण्यातल्या शाहादावल बाबा दर्ग्याच्या (Shahadawal Baba Dargah) निधी प्रकरणात (funds From Government) तंतोतंत खरी ठरताना दिसत आहेत. कारण, शासनाकडून अवघ्या 72 रुपयांचा निधी मिळवण्यासाठी ट्रस्टला हजारो रुपये खर्च (Thousands of rupees spent) करावे लागत आहेत. सरकारकडून दरवर्षी येरवड्यातील (Yerawada) प्रसिद्ध शाहादावल बाबा दर्ग्याला दिवाबत्तीचा खर्च म्हणून वर्षाकाठी फक्त 2 रुपये दिले जातात. ज्यात तेल तर सोडा, वातही येत नसतील. पण, तरीही शासनानं गेल्या 36 वर्षांपासून हाही निधी दर्ग्याला दिलेला नाही. (Thousands of rupees spent on Shahadawal Baba Dargah to get funds From Government)

2 रुपयांच्या निधीसाठी एवढा खर्च का?

हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण फक्त 2 रुपयांच्या निधीपुरतं हे प्रकरण मर्यादित नाही. शासन अभिलेखात दर्ग्याची नोंद राहावी, आणि दर्ग्याला संरक्षण मिळावं म्हणून दर्ग्याच्या विश्वस्तांकडून हा खटाटोप सुरु आहे. मात्र, ‘सरकारी काम आणि वर्षानुवर्ष थांब’ असाच अनुभव विश्वस्तांना येत आहे. 36 वर्षांचे 72 रुपये दिवाबत्तीचा खर्च मिळविण्यासाठी अनेकदा हजारो रुपये खर्चून विश्वस्तांनी शासनाला प्रतिज्ञापत्र पाठविलं. पण आजतागायत दर्ग्याला निधी मिळालेला नाही.

धार्मिक स्थळांना निधी देण्याची परंपरा कधीपासून?

पेशवे काळापासून प्राचीन मंदिरे, मशीद आणि दर्गा अशा देवस्थानला दिवाबत्तीसाठी खर्च दिला जातो.पेशवानंतर ब्रिटिशांनी दिवाबत्तीचा खर्च देण्याची परंपरा कायम राखली होती. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर शासनाकडून मागील अनेक वर्षांपासून शहरातील प्राचीन मंदिरे, मशीद आणि दर्गा अशा सर्वधर्मीय देवस्थान आणि प्रार्थनास्थळांना दिवाबत्तीच्या खर्चासाठी दरवर्षी 2 रुपये दिले जातात. पण गेल्या 36 वर्षांपासून शासनाकडून शाहादावल बाबा दर्ग्याला दिवाबत्तीचा दरवर्षीप्रमाणे 2 रुपयांचा निधी मिळालेला नाही. शासनाकडून दर्ग्याला वर्षाला मिळणारे 2रुपये निधी अत्यंत कमी असला तरी सरकारी दफ्तरी दर्गा देवस्थानची नोंद राहण्यासाठी विश्वस्तांना झटावे लागत आहे

दर्ग्याला निधी कधी मिळत होता, आणि कधी निधी बंद झाला?

शाहादावल बाबा दर्ग्याला पेशव्यांपासून दिवाबत्तीचा खर्च मिळण्यास सुरुवात झाली. पेशवाईनंतर 1938 पर्यंत ब्रिटिशांकडून हा खर्च मिळत होता. तर स्वातंत्र्यानंतर शासनाकडून दिवाबत्तीसाठी 2 रुपये खर्च मिळत होता. शासनाकडून 1983 पर्यंत दर्ग्याला दरवर्षी दिवाबत्तीचा खर्च मिळला. पण 1984 नंतर शासनाकडून दर्गायला 2 रुपये निधी मिळणे बंद झालं. वर्षाला 2 रुपये निधी अत्यंत किरकोळ रक्कम आहे. आजच्या महागाईच्या काळात 2 रुपयांत चहा देखील मिळत नाही. पण शासन दरबारी अभिलेखात दर्ग्याची नोंद टिकून राहण्यासाठी वर्षाला 2 रुपयांच्या निधीची गरज आहे. किमान आतातरी झोपलेल्या प्रशासनानं या 2 रुपयांना निधी देणं अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या:

साई बाबांच्या आरतीसाठी देणगीची मागणी? महिला भाविकांचा आरोप

मंदिरात तोकडे कपडे नको, भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, साईबाबा संस्थानचे आवाहन

(Thousands of rupees spent on Shahadawal Baba Dargah to get funds From Government)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.