Pune local : पुणे ते लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; धावणार तीन अतिरिक्त लोकल, वाचा सविस्तर
पुणे ते लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-लोणावळा (Pune Lonavala) या लोहमार्गावर तीन अतिरिक्त लोकल (Local) रेल्वे (Railway) गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
पुणे : पुणे ते लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-लोणावळा (Pune Lonavala) या लोहमार्गावर तीन अतिरिक्त लोकल (Local) रेल्वे (Railway) गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. बुधवारपासून पुणे आणि शिवाजीनगर या अतिरिक्त तीन रेल्वे गाड्या सहा फेऱ्यांसह प्रत्यक्ष धावणार आहेत. मध्य रेल्वेने (Central railway) ही माहिती दिली आहे. लोणावळा लोकल रेल्वेने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी कोरोनामुळे ही सेवा बंद झाली होती. ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात लोकलच्या चार रेल्वे गाड्यांसह आठ फेऱ्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होताच 20 फेऱ्यांसह लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. आता बुधवारपासून एकूण 13 रेल्वे गाड्यांसह आणि 26 फेऱ्यांसह लोकल धावणार आहे.
प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर फेऱ्याही वाढणार
कोरोनाच्या आधी एकूण 42 फेऱ्यांसह ही लोकल सेवा होती. टप्प्याटप्प्याने ही सेवा पूर्वीप्रमाणे पूर्ववत केली जाणार आहे. सध्या प्रवासी केवळ 40 टक्केच आहेत. प्रवाशांची संख्या वाढेल तशी लोकलची संख्या वाढवली जाईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.
लोकलचे वेळापत्रक
– पुणे स्टेशन-शिवाजीनगर ते लोणावळा – पुण्याहून सकाळी 11.17 वाजता सुटेल आणि 12.37 वाजता लोणावळ्यात – लोणावळ्यातून 3.30 वाजता सुटेल आणि पुण्यात 5.05 वाजता पोहचेल – पुण्याहून 5.15 वाजता लोणावळ्यात 6.38 वाजता पोहचेल – लोणावळ्यातून 7 सुटेल आणि शिवाजीनगरला 8.25 वाजता पोहचेल. – शिवाजीनगर ते लोणावळा – शिवाजीनगरहून 8.35 वाजता सुटेल आणि 9.51 वाजता लोणावळ्यात पोहचेल – लोणावळ्यातून 10.5 वाजता सुटून पुण्यात 11.25 वाजता पोहचेल.