पुणे – लष्करातून निवृत्त झाल्यानंतर वयाच्या 81 वर्षी आयुष्याला आधार देण्यासाठी साथीदार शोधणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकार्याची (Retired army officer)तीन तरुणींनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील धायरी परिसरात ही घटना घडली आहे. या अधिकाऱ्याला लग्नासाठी मुली दाखवतो असे सांगत तीन विवाह नोंदणी संस्थानी(Marriage Registration Institution) मिळून जवळपास 95 हजारांची फी आकारत त्यांना मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे स्थळ न दाखवता गंडा घातला आहे. फसवणूक झाल्याचे समोर येताच लष्करी अधिकाऱ्याने सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police)तीन विवाह संस्था व तेथील तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
तर झालं असं
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निवृत्त लष्कर अधिकारी आहेत. ते घरात एकटेच असतात. त्यांचा सांभाळ करायला कोणी नाही. उतार वयात आपली देखभाल करण्यासाठी कोणीतरी जोडीदार असावी, या हेतूने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी मुलींसाठी विवाह मंडळाशी संपर्क साधला. तेव्हा या विवाह मंडळातील महिलांनी त्यांना लग्नासाठी स्थळ पाहण्याचे सांगून त्यासाठी फी म्हणून व संबंधित महिलांनी विविध खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून फेब्रुवारी ते सप्टेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने 95 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र, कोणतेही स्थळ न दाखविता फसवणूक केली. कुलस्वामीनी विवाहमंडळ -शोभा साखरे, भाग्यलक्ष्मी विवाह मंडळ वर्धा, मंजू पवार , स्वयंवर विवाह मंडळ पुणे – अंकिता भोसले यांनी आपली फसवणूक केल्याचे आपल्या फिर्यादीत लिहिले आहे.पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत.