Big News: तलावाच्या काठावर कपडे दिसले अन् काळजाचा ठोका चुकला, दौंडमध्ये तीन तरुण मित्रांचा करुण अंत

बराच वेळ झाल्याने हे तिघे घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता तळ्याजवळ जाऊन पाहीले असता तिथे दुचाकी मिळून आल्याने दौंड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी लोकांच्या मदतीने तलावातील पाण्यात शोध घेतला असता पाण्यात तिघांचा मृतदेह आढळून आला.

Big News: तलावाच्या काठावर कपडे दिसले अन् काळजाचा ठोका चुकला, दौंडमध्ये तीन तरुण मित्रांचा करुण अंत
Three youths drownedImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:08 PM

पुणे – दौंड तालुक्यातील कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ असेलेल्या साठवण तलावात(pond) बुडून तीन युवकांचा करुण अंत (Youth  Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुण दौंड नगरपालिकेला (Daund Municipality) पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकी वर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने हे घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद होता. त्यानंतर शोधाशोध सुरु केली असता पाण्याच्या तलावाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर शोध घेतला असता तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. युवकांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

असा झाला उलगडा

घटनेच्या दरम्यान असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख तिघेही पोहण्यासाठी म्हणून तलावावर गेले होते. मात्र बराचवेळ झाला तरी तिघेही न परतल्याने घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला मात्र रिंग वाजत होती . पण उचलला जात नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांनी मित्रांना फोन लावला मात्र तरी फो उचलला जात नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख ,रफिक इकबाल सय्यद ,कलिम सलीम सय्यद या सर्वजणांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

लोकांचा संशय बळावला

शोध घेत असताना दौंड शहरात मेगळवाडी, लिंगाळी येथील पिण्याचे पाणी पुरवठा करणारे दौंड नगरपालिकेच्या तळ्याजवळ जाऊन पाहिले असता तेथे गाडी मिळून आली. त्यामुळेशोध घेणाऱ्या लोकांचा संशय बळावला. त्यांनी तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय आल्याने दौंड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलीसांनी तलावातील पाण्यात जावून शोध घेतला. त्यावेळी त्या तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!

Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.