पिंपरी चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune express way) वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ट्रेलरने टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाला असून या भीषण अपघातानंतर (Accident) एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. बोरघाटातील ट्राफिक पोलीस चौकीनजीक ट्रेलर पलटी झाला आहे. यात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा अनेकांना फटका बसला आहे. या भीषण अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्रक आणि ट्रेलर यांच्या धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रक उलटला होता. तर ट्रेलरचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस हाययेवर वाहतुकीची कोंडी (Traffic jam) झाली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले. चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. ट्रेलरने टेम्पोला धडक दिली होती. त्यात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अपघातानंतर दोन्ही गाड्या महामार्गावर पलटी झाल्या होत्या. दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली का, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी डायव्हर्जनही आहेत. दोन्ही बाजूंना लोणावळ्याजवळ 1000 मीटर लांबीच्या मार्गावर लेन जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेले बांधकाम हा महामार्गावरील राज्य सरकारच्या ‘मिसिंग लिंक प्रोजेक्ट’चा भाग आहे. या कामामुळेही अपघात होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून जास्त होत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गॅस टँकर विरूद्ध बाजूला कारला धडकला. त्यात या कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. खोपोली एक्झिटजवळ या अपघाताची घटना घडली होती. टँकर पुणे लेनवरून मुंबई लेनमध्ये जाऊन एका कारला ठोकरला होता. याशिवाय अपघात होण्याचे सरासरी प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढल्याचे दिसत आहे.