Expressway : वीकेंड अन् सलग सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावर अभूतपूर्व कोंडी, 3 तासाच्या प्रवासाला लागले 8 तास!

पुणे-मुंबईची वाहने हिलस्टेशनवर आल्यानंतर अंतर्गत रस्तेही दुपारपर्यंत कोलमडले होते. भुशी डॅम आणि अॅम्बी व्हॅलीकडे जाणारा रस्ता दुपारपर्यंत कोलमडून गेला होता. संध्याकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

Expressway : वीकेंड अन् सलग सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावर अभूतपूर्व कोंडी, 3 तासाच्या प्रवासाला लागले 8 तास!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी झालेली वाहतूककोंडीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:12 PM

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Pune Mumbai Expressway) अभूतपूर्व अशी वाहतूककोंडी पाहायला मिळाली. मुंबईहून निसर्गरम्य लोणावळा-खंडाळा, पुणे आणि पुढे महाबळेश्वर तसेच गोवा यांसारख्या लोकप्रिय ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रचंड कोंडी (Traffic jam) झाली होती. विकेंड आणि सलग सुट्ट्या यामुळे ही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेने सुमारे 148 किमी प्रवास करण्यासाठी शनिवारी आठ तास लागले. तर नेहमीच्या प्रवासाची वेळ साडेतीन तासांची आहे. विशेषत: खालापूर ते लोणावळा (Lonavala) दरम्यानच्या भागात परिस्थिती अधिकच बिकट होती. चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा, छोटी व्यावसायिक आणि अवजड वाहने अनेक लेनमधून पुण्याहून मुंबईच्या दिशेने धिम्या गतीने जात होती.

‘लोणावळ्यात मुक्काम’

अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी झाली होती. लोणावळा-खंडाळा हिल स्टेशनमधील पवना धरण, लोहेगड, विसापूर, कार्ला, भाजे, भुशी धरण, राजमाची, तिकोना, तुंग, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, वळवण, शिरोटा, उकसान आणि इतर पिकनिक स्पॉटकडे जाणारे बहुतांश रस्ते पॅक झाले होते. आम्ही सकाळी 7.30च्या सुमारास घरून निघालो आणि 9.45च्या सुमारास खालापूर टोल प्लाझाजवळ पोहोचलो. पण त्यानंतर लोणावळ्याला पोहोचण्यासाठी आम्हाला आणखी तीन तास लागले. संपूर्ण गोंधळ होता आणि माझी गाडी गोगलगायीच्या वेगाने पुढे जात होती. आम्ही लोणावळ्यात मुक्काम करणार आहोत. दोन दिवस, असे ठाण्यातील एका पर्यटकाने सांगितले.

‘सिंहगड कॉलेज ओलांडल्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलो’

औंधच्या एका रहिवाशाने सांगितले, की आमचा तुंगार्ली येथे एक छोटासा बंगला आहे. आम्ही आमचा वीकेंड तिथेच घालवतो. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास आम्ही घरून निघालो, पण लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेज ओलांडल्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलो. दुपारी 1च्या सुमारास आम्ही आमच्या बंगल्यावर पोहोचलो. मी आणि माझे कुटुंबीय जवळपास पाच तास या कोंडीत अडकलो होतो.

हे सुद्धा वाचा

‘आठ तास लागले’

खराडी येथील एका व्यावसायिकाने सांगितले, की मुंबईहून पुण्याला पोहोचण्यासाठी मला आठ तास लागले. विशेषतः खालापूर टोलनाक्यावरील परिस्थिती वाईट होती. लोणावळा (शहर) पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांनी सांगितले, की सकाळच्या वेळेस एक्स्प्रेस वेचा पुणे कॉरिडॉर जॅम झाला होता, तर मुंबई कॉरिडॉर संथ गतीने पुढे जात होता. दुपारनंतर परिस्थिती सुधारली. आम्ही एक्स्प्रेसवे आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचे नियमन केले.

उशिरापर्यंत होती कोंडी

ते म्हणाले, की पुणे-मुंबईची वाहने हिलस्टेशनवर आल्यानंतर अंतर्गत रस्तेही दुपारपर्यंत कोलमडले होते. भुशी डॅम आणि अॅम्बी व्हॅलीकडे जाणारा रस्ता दुपारपर्यंत कोलमडून गेला होता. संध्याकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

‘दुपारनंतर वाहनांची संख्या कमी’

हायवे सेफ्टी पेट्रोलिंग अधिकाऱ्याने सांगितले, की लाँग वीकेंडमुळे आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता. पोलीस पहाटेपासून रस्त्यावर होते, परंतु वाहनांची संख्या इतकी जास्त होती, की त्यांनी एक्स्प्रेस वेच्या प्रवेश आणि बाहेर पडताना अडथळे निर्माण केले. दुपारनंतर वाहनांची संख्या कमी झाली.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.