इंदापूर – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काल इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते, इंदापूर (Indapur) तालुक्यातील बावडा या गावी त्यांच्या हस्ते 69 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले गेले. त्यानंतर बावडा गावातील बाजार तळावरती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाखाली जंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र ही सभा रात्री अकरा वाजले तरी सुरूच राहिली होती. स्वतः राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाषणात तसा उल्लेख ही केला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Minister of State Dattatraya Bhrane) म्हणाले “आता फक्त पावणे अकरा वाजले आहेत..” त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) जो आदेश दिला आहे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करणाऱ्या उपकरणावरती बंदी आहे, या आदेशानुसार लाऊडस्पीकर वाजवण्यापासून ते मोठ्या आवाजात संगीत, फटाके फोडण्या पासून हॉर्न वाजेपर्यंत बंदी घालण्यात आल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे.
न्यायालयाच्या आदेशाला राज्यमंत्री स्वतः केराची टोपली देत असून इंदापूर तालुक्यातील प्रत्येक सभेत त्यांच्याकडून या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे.. राज्यमंत्री भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वस्व मानतात., त्यांच्यामुळेच मी आज या जनतेसमोर उभा आहे अशीही भाषणात नेहमीच वक्तव्य करतात, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार ज्याप्रमाणे नियमांचे तंतोतंत पालन करतात तसे भरणे मात्र पालन करताना दिसून येत नाही. महाराष्ट्रात सर्वत्र भोंग्या वरून राजकारण सुरू असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कडकपणे महाराष्ट्रात अंमलबजावणी केली जात आहे.. अशे असले तरी इंदापूर तालुक्यात मात्र राज्यमंत्र्यांच्या सभेचा भोंगा सुसाट वाजत असून, रात्री अकरा वाजले तरी हा भोंगा थांबता थांबत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेहमीच इंदापूर तालुक्यावर ती लक्ष असते, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे त्यांचे जवळचे सहकारी मानले जातात, जर भरणे अशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार भरणे यांना काही समज देणार का? की त्यांना पाठीशी घालणार व त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भोंगे अशेच वाजत राहणार याकडे सबंध इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.