Pune accident : पुण्यातल्या लोणी काळभोर टोलनाक्यावरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; दोन्ही कारचा चुराडा
हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात एका गाडीचा चालक आणि एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. दुसऱ्या कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.
लोणी काळभोर, पुणे : लोणी काळभोर (Loni Kalbhor) टोलनाक्यावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून यवतकडे जाणाऱ्या तसेच यवतच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या 2 गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. ही घटना पहाटे तीन वाजताची असून अपघातातील (Accident) एका गाडीमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रस्त्यावर असलेल्या एका पादचाऱ्याच्याही यात मृत्यू झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात एका गाडीचा चालक आणि एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. दुसऱ्या कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.