Uday Samant car Attack : उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 5 जणांना पोलीस कोठडी; शिंदे-ठाकरेंमधील दरी वाढत जाणार?
शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी (Pune Police) सुनावलीय. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला आता यापुढील शिंदे गट आणि सेनेतील संघर्ष वाढवणारा आहे.
पुणे : माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार उदय सामंत (Uday Samant Car Attack) यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात (Baban Thorat) तसेच शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी (Pune Police) सुनावलीय. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला आता यापुढील शिंदे गट आणि सेनेतील संघर्ष वाढवणारा आहे. राज्यात आधीच संजय राऊत यांची अटक आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप सध्या शिगेला पोहोचले आहेत. त्यामुळे भाजप आणि विरोधक हे पुन्हा आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी, सोनिया गांधींच्या चौकशीवरून सध्या काँग्रेसही आक्रमक मोडवरती आलीय. अशातच आता उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणाने या पेटलेल्या राजकारणाला आणखी मोठी हवा देण्याचं काम केलंय.
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यात मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. आणि त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांचीही पुण्यात सभा..मुख्यमंत्री आपल्या पुणे दौऱ्यात आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार होते.तानाजी सावंतांच्या निवासस्थानाजवळच कात्रज चौकात आदित्य ठाकरेची सभा होती, त्यामुळे शिंदे समर्थक आणि सेना कार्यकर्ते यांच्यात संघर्ष होणार हे आधीच स्पष्ट झालं होतं..आणि झालंही तसच एकनाथ शिंदे ज्यावेळी तानाजी सावंताकडे गेल्यानंतर पाठीमागून आलेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकानी हल्ला केला. मुख्यमंत्री पुणे दौऱयांवर असतानाच आपल्याच गटाच्या आमदारावर हल्ला झाल्यामुळे मुख्यमंत्रीही संतप्त झालेत..दगडफेक करून जाणे हे नामर्दाचे काम असल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तर या टीकेवरही शिवसैनिक संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख थोरात यांना अटक
दरम्यान याप्रकरणी बबन थोरात हे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख आहेत. आमदार सावंत यांच्यावरील हल्ल्यात ते प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात बोलताना त्यांनी शिवसैनिकांना चिथावणक्ष मिळेल, अशी भाषा वापरली होती. त्यामुळे त्यानाही अटक करण्यात आली. शिवाय पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करणयात आली, दरम्यान या सर्व आरोपींना 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय..मात्र यापुढच्या काळात जर अशीच तोडफोड सुरू राहिली तर राज्याच राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जाणार हे लक्षात येतंय. राज्यात गेल्या एक महिन्याभरापूर्वी पेटलेला हा संघर्ष काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये.