‘कोरोनाचा परिणाम महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर होऊ नये, परिस्थिती पाहून निर्णय घ्या’, उदय सामंतांचे आदेश
वाढत्या कोरोनाचा परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय.
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी शाळा आणि महाविद्यालयांबाबत महत्वाचा निर्णय घेण्याची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाचा परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. येत्या काळातील परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.(decision on colleges be taken based on Corona’s situation)
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी जे करावं लागेल ते सर्व राज्य सरकार करेल, असा दावाही उदय सामंत यांनी केलाय. विधिमंडळ अधिवेशनावरुन सध्या विरोधकांकडून सरकारवर टीका सुरु आहे. त्यावरही उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे. अधिवेशन होऊ नये म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे, असं दादा म्हणत असतील तर यावर काय बोलावं, असं सामंत म्हणाले. मग गुजरात आणि मध्य प्रदेशातही अधिवेशन होऊ नये म्हणून कोरोना वाढतोय का? असा खोचक सवाल उदय सामंत यांनी विचारलाय.
औरंगाबाद आणि परभणीत शाळा बंद
परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसंच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 9वी आणि 11वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. दुसरीकडे औरंगाबादेतील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबाद माहनगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे.
कोचिंग क्लासेसवर कारवाई
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं आता कोचिंग क्लासेसवर कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलाय. महापालिकेकडून 6 कोचिंग क्लासेस चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कोचिंग क्लासेसकडून 26 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय
मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय
decision on colleges be taken based on Corona’s situation