उदयनराजे वेटिंग लिस्टवर, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत; मोठी मागणी काय?

अखेर लोकसभा निवडणुकांच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. भाजप आणि काँग्रेसने या निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. मात्र, त्यात उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

उदयनराजे वेटिंग लिस्टवर, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत; मोठी मागणी काय?
खासदार उदयनराजे भोसलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 2:46 PM

सातारा | 15 मार्च 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर केली आहे. त्यातील महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत हीना गावित, स्मिता वाघ, रक्षा खडसे यांच्यापासून ते पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांची नावे आहेत. सुजय विखे पाटील यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. पण या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. पण सातारा हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असं असतानाही साताऱ्याची सीट जाहीर न केल्याने उदयनराजे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. या समर्थकांनी साताऱ्यातील शिवतीर्थावर जमून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात 20 जणांना तिकीट देण्यात आलं आहे. राज्यातील या पहिल्या यादीत नव्या आणि जुन्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट जाहीर न केल्याने मराठा समाज प्रचंड नाराज झाला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

राजे, स्वबळावर लढा

साताऱ्याच्या पोवई नाका येथील शीवतीर्थावर मराठा समाज एकवटला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर या कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाने घोषणा दिल्या. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. उमेदवारी मिळत नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.

राजीनामे तयार

भाजपच्या यादीत उदयनराजे भोसले यांचं नाव न आल्याने कार्यकर्त्यांनी काल रात्रीच राजीनामे तयार केले आहेत. पुढील काळात उदयनराजे यांचं नाव जाहीर न झाल्यास आम्ही पदांचे राजीनामे देऊ, असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे. उमेदवारी जाहीर न झाल्यास उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.