Uddhav Thackeray : नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं?; उद्धव ठाकरे यांनी फटकारले

Uddhav Thackeray On Amit Shah : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाहुणचार घेणाऱ्यांकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी घातला

Uddhav Thackeray : नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं?; उद्धव ठाकरे यांनी फटकारले
उद्धव ठाकरे यांचा मोदी-शाह यांच्यावर प्रहार
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 2:30 PM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं का? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घातला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पण यावेळी निशाणा साधला. यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून विधानसभेचा शंखनाद केला होता. आज उद्धव ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर आसूड ओढले. त्यांच्या जहाल भाषणाने आता रान पेटवले आहे.

यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ते अफगाणिस्तानचे वंशज असल्याचा टोला त्यांनी लगावला. विधानसभेपूर्वी राज्यातील राजकारणात जहाल भाषा वापरली जात आहे. दोन्ही गोटातून एकमेकांवर जहाल टीका सुरु आहे. जस-जशी ही निवडणूक जवळ येत आहे, राजकीय नेत्यांच्या भाषेला धार येत आहे. महाराष्ट्र कायम अन्यायाच्या विरोधात आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी शाह-मोदींच्या हुकूमशाहीविरोधात कोणी बोलत नव्हते. ते काम महाराष्ट्राने केले. आपला पक्ष हा राज्याच्या असंतोषाचा जनक असल्याचे ते म्हणाले.

तुमच्याकडून हिंदुत्व शिकायचं का?

हे सुद्धा वाचा

शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे म्होरके आले, त्यांनी अमित शाह यांच्यावर यावेळी आसूड ओढला. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं, का असा सवाल त्यांनी केला.

हा सत्ता जिहाद

आमचे हिंदुत्व त्यांच्यासारखे नाही. आमचे हिंदुत्व हे शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व आहे. शं‍कराचार्यांनी जे हिंदुत्व सांगितले ते हिंदुत्व आहे, असे त्यांनी सांगितले. मुस्लिमांनी आम्हाला मतदान केले की आम्ही औरंगजेब फॅन क्लबवाले ठरतो. ज्यांच्या घोषणापत्रात मुस्लिमांच्या हिताचे निर्णय जाहीर करण्यात येतात, ते पण मुस्लिमधार्जिणे होतात. मग नितीश कुमार हे कोणते हिंदुत्ववादी आहेत, चंद्रबाबू नायडू हे कसे हिंदूंचे नेते ठरतात, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. त्यांनी भाजप सत्ता जिहाद करणारा पक्ष असल्याचा हल्लाबोल चढवला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.