पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बीडमध्ये ऊसतोडणी मजुरांचा मेळावा घ्या, मी त्या मेळाव्याला उपस्थित राहीन, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं. तर, ऊस तोडणी कामगारांच्या हातात कोयत्या ऐवजी आपण वही पेन पुस्तक देऊया, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
नव्या वर्षाची सुरवात झालीये, सर्वांना शुभेच्छा देतो. महाविकास आघाडीच्या शुभेच्छा कोरड्या नसतात. जनतेच्या आयुष्यात सुखा समाधानाचे दिवस आणण्याच्या असतात. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की या महामंडळाला गोपीनाथ मुंडे यांच नाव दिलं आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचं नाव दिलं यावरुन पक्षभेद विसरून महाविकास आघाडी कस काम करते याच हे उदाहरण आहे. त्यानुसार आजच्या या महामंडळाला आपण गोपीनाथराव मुंडे यांचं नाव दिलं आहे.
#थेटप्रक्षेपण
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा लोकार्पण सोहळा
https://t.co/OoELaNXR6e— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 3, 2022
गोपीनाथ राव म्हणल्यावर शिवसेना, मुंडे कुटुंबीय, महाजन कुटुंबीय नाही म्हणलं तरी ते सगळे दिवस आठवतात. शिवसेना मुंडे परिवार आणि त्यांचा पक्ष भाजप आम्ही संघर्ष करून अनेक गोष्टी मिळवल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. ऊस तोड कामगारांना ऊन वारा पाऊस विसरुन काम करावं लागतं. ऊस तोडणीच्या निमित्तानं स्थलांतर करण्याऱ्या मुलांच्या हाती आपण वही पेन देत आहोत. संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्यावतीनं 20 वसतीगृह सुरु करणार आहोत. ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र देणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या नुसत्या घोषणा नाहीत हल्लीच जग हे दिखाव्याच झालं आहे. पण आम्ही तसं करत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मी मुबंईच्या बाहेर अजुन कार्यक्रम घेतले नाहीत. लवकरच मुबंईचा बाहेर कार्यक्रम घेईल. धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये ऊसतोड कामगारांचा मेळावा घ्यावा त्याला मी येईन. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयता द्यायच्या ऐवजी वही पेन पुस्तक देणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मी कुटुंब प्रमुख म्हणून जे काम या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे त्या कामाला सरकारचा पाठिंबा आहे आणि तो राहिल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.
Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून…
इंदिरा गांधींच्या 75 किलोच्या चांदीचा वारसदार कोण?; सध्या या चांदीची किंमत आहे ‘एवढी’