उद्धव ठाकरेंचा बडा शिलेदार अजित पवारांच्या गळाला ? विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

| Updated on: Oct 11, 2024 | 2:05 PM

ajit pawar uddhav thackeray: अजित पवार शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. त्याबद्दल काही दिवसांपूर्वी आमदार अशोक पवार यांनी विचारण्यात आले. ते म्हणाले, माझी कोणाविरुद्ध लढण्याची पूर्ण तयारी आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुठूनही लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शिरूरमध्ये कुणीही येऊन लढू शकतो.

उद्धव ठाकरेंचा बडा शिलेदार अजित पवारांच्या गळाला ? विधानसभेच्या रिंगणात उतरणार?
ajit pawar uddhav thackeray
Follow us on

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता सुरु होणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा केल्या जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. दुसरीकडे महविकास आघाडीतील नेत्यांवर महायुतीने लक्ष ठेवले आहे. आता शिवसेना उबाठामधील महत्वाचा शिलेदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्या शिलेदारास थेट विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे यांचा खास शिलेदार पक्ष सोडणार आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष असलेले माऊली आबा कटके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. त्यांचा पक्ष प्रवेश सोहळाही लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमदार अशोक पवारांपुढे आव्हान

उबाठा गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके अजित पवारांचे घड्याळ हाती घेणार आहे. त्यानंतर शिरुर विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. शरद पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्या पुढे आव्हान उभे करण्यासाठी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके यांना मैदानात उतरवले जाणार आहे. २००९ ते २०१४ आणि त्यानंतर २०१९ पासून त्यांचे वर्चस्व या मतदार संघावर आहे. ते मोडीत काढण्यासाठी माऊली आबा कटके यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्या निर्णयानंतर समीकरणे बदलली

अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे ते शिरुर मतदार संघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अजित पवार यांनी बारामतीतूनच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील राजकिय गणित बदलाला सुरुवात झाली आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आमदार अशोक पवार यांना आव्हान देण्यात येणार आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून शिरुर हवेली मतदार संघात आखणीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे माऊली आबा कटके यांचा जाहीरपणे पक्ष प्रवेशही लवकर होणार असल्याची चर्चाही सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

अशोक पवारांनी दिले होते अजित पवार यांना आव्हान

अजित पवार शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. त्याबद्दल काही दिवसांपूर्वी आमदार अशोक पवार यांनी विचारण्यात आले. ते म्हणाले, माझी कोणाविरुद्ध लढण्याची पूर्ण तयारी आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुठूनही लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शिरूरमध्ये कुणीही येऊन लढू शकतो.