गद्दार नव्हे हा तर सुपर गद्दार निघाला, उद्धव ठाकरे यांच्या बहिणीची टीका कुणावर?

पण, आपल्याकडं एक निर्लज्ज पुरंदरचा बापू आहे. त्यानी आज स्वतःच्या पापाची कबुली दिली.

गद्दार नव्हे हा तर सुपर गद्दार निघाला, उद्धव ठाकरे यांच्या बहिणीची टीका कुणावर?
कीर्ती पाठक, उद्धव ठाकरे यांची बहीण
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 8:28 PM

पुणे : उद्धव ठाकरे यांची आतेबहीण कीर्ती पाठक यांनी विजय शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली. कीर्ती पाठक म्हणाल्या, मी टीव्हीवर बातमी बघत होते. आतापर्यंत आम्ही गद्दार, उद्दार असं आम्ही म्हणत होतो. पण, आज तर मी त्यांच्यातला सुपर गद्दार बघीतला. तो स्वतःच्या पापाची कबुली देत होता. तेही वा आपण काय ग्रेट काम केलं, अशा थाटात. कीर्ती पाठक यांनी सांगितलं की, तुम्ही सर्वांनी एक फेमस कादंबरी वाचली असेल. श्री. ना. पेंडसे यांची गारंबीचा बापू. कोकणातल्या एका गावातील प्रेमकहाणीची ही कथा होती. एका विधवेवर त्याचं प्रेम बसतं नि तिच्याशी लग्न करून बापू आयुष्याचं भलं करतो. सामाजिक भान जपणारी आणि सामाजिक क्रांती करणारी अशी ती एक कथा होती.

बापू म्हटलं की, गारंबीच्या बापूची आठवण येते. पण, आपल्याकडं एक निर्लज्ज पुरंदरचा बापू आहे. त्यानी आज स्वतःच्या पापाची कबुली दिली. खरं म्हणजे बापू या नावाला त्यांनी खूप सार्थ व्हायला पाहिजे होतं.

कारण बापू हा शब्द आपल्या डोक्यात अनेक अर्थानं येतो. गावाचा उद्धार केला तो बापू. महिलेचा उद्धार करणारा सन्मान करणारा असा गारंबीचा बापू. आणि या बापूनं घरच्या महिलेला फसविलं. आणखी तीन बायका केल्या, असा हा पुरंदरचा बापू, अशी घणाघाती टीका कीर्ती पाठक यांनी केली.

गद्दारीची बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात रोवली. असं खुलेआम सांगतो नि पापाची कबुली देतोय. काय म्हणावं या गद्दाराला. या पुरंदरच्या बापूला निवडणुकीमध्ये गाडल्याशिवाय स्वस्त बसू नका. हा बापू घातक आहे. याला गाडलाचं पाहिजे, असा इशाराही कीर्ती पाठक यांनी दिला.

Non Stop LIVE Update
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...