लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway)अपघात हे नित्याचे झाले आहे. गेल्या अनेकदा दिवसांपासून सुरु असलेली ही अपघाताची मालिका अद्यापही थांबलेली नाही. सातत्याने होणारे अपघात
(Accident) थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही आंदोलनही केलं. मात्र अद्यापही वाहतूक कोंडीची (Traffic jams) व अपघाताच्या मालिकेचा तिढा सुटलेला नाही. यातूनच अनेकदा प्रवाश्यांचे एकमेकांवतर हमरातुमरीवर येण्याचे अनेक प्रसंगही घडले आहे. अश्यातच धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कार व माश्यांची वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोची धडक झाली. या धडकेत कारचे नुकसान झाले. या घटनेने मुळे रागावलेल्या कार चालकाने थेट टेम्पो पटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याघटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र टेम्पो जाळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली.
आज पहाटेच्या सुमारास भेंडे आडनावाचा कार चालक मुंबईवरून पुण्याला येत होता. लोणावळ्याला जवळ आल्यानंतर त्यांची धडक माश्यांची वाहतूक पुढच्या छोटा हत्तीला लागली. या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनेमुळे चिडलेल्या कार चालकाने टेम्पो चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याच रागातून भेंडे नावाच्या कार चालकाने छोटा हत्ती पेटवून दिला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण छोटा हत्ती जळून खाक झाला. काहीकाळ पुण्याकडे येणारी वाहतूक विस्कळीत होती. ती आता पूर्ववत झालेली आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी केळीची वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाल्याने सर्व केळी रस्त्यावर पसरली होती. त्यामुळे महामार्गावरील इतर वाहने ही घसरल्याची घटना घडली होती . यावेळीही पोलिसांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेत रस्ता साफ करता वाहतूक सुरळीत केली होती. सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी योग्य ती पावले शासने उचलावीत. महामार्गावर आवश्यक ते वाहतू बदल करावेत अशी मागणी
लोणावळा व परिसरातील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहेत.
वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!
‘ओला’ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर कट्टा, बॉटनिकल गार्डनसाठी शोधताहेत फूलं!